Facebook Instagram Down : मंगळवारी रात्री अचानक फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि थ्रेड्स या सर्वात मोठ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाऊन झाले. जगभरातील अनेक यूजर्सनी नोंदवले की त्यांचे अकाऊंटस आपोआप लॉग आऊट होऊ लागले आहेत. या जागतिक बंदमुळे भारतासह जगभरातील लाखो यूजर्सना मनस्ताप सहन करावा लागला. पण, असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे अशातला भाग नाही. याआधीही अनेकदा फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन झालं आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही वापरून पाहू शकता. या सोप्या ट्रिक्स कोणत्या त्या जाणून घेऊयात. 


फेसबुक आणि इंस्टाग्राम सर्व्हर डाऊन


या जागतिक आऊटेजवर प्रतिक्रिया देताना मेटाने सांगितले की, काही तांत्रिक समस्येमुळे अशी समस्या उद्भवली आहे. मात्र, काही काळानंतर अनेकांच्या समस्या संपल्या आणि फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स तिन्ही अॅप अगदी सुरळीत सुरु झाले. पण, यानंतरही सोशल मीडियावर अनेक यूजर्सचं म्हणणं आहे की, हे अॅप्स वापरण्यात अजूनही काही अडथळे येतायत. जर, तुम्हालाही या अॅप्सचा वापर करताना काही समस्या येत असतील तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता.  


स्मार्टफोन यूजर्ससाठी



  • तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर हे ॲप्स वापरत असाल आणि लॉग इन करण्यात जर अडचण येत असेल, तर तुमचे ॲप UnInstall करा आणि पुन्हा डाऊनलोड करा. तुमच्या मोबाईलमध्ये Install करा. 

  • त्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. लॉग-इनची प्रोसेस करताना तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नीट आहे ना याची खात्री करा.  

  • याशिवाय, जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये या ॲप्समध्ये लॉग इन करू शकत नसाल, तर सर्वात आधी वेब ब्राउझरमध्ये या ॲप्समध्ये लॉग इन करा आणि नंतर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. यामुळे तुमचं लॉग इन सुरळीत होईल. 


वेब यूजर्ससाठी



  • जर तुम्ही वेब ब्राउझरमध्ये फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर लॉग इन करत असाल आणि लॉग इन होत नसेल तर सर्वात आधी तुमचा ब्राऊझर रिफ्रेश करा. त्यानंतर लॉन इन करण्याचा प्रयत्न करा.  

  • त्यानंतरही तुमचं लॉन इन होत नसेल तर वेब ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये जा. आणि Cashe Files क्लिअर करा. त्यानंतर नवीन ब्राउझर ओपन करून त्यात पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा.  


'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या  


अनेक वेळा फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये असे घडते की यूजर्स फॉलो करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना वगळून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत युजरचे अकाऊंटही लॉक होऊ शकते. अशा वेळी, तुम्ही हेल्प सेंटरवर जाऊन मदत मागू शकता आणि तुमचं अकाऊंट पुन्हा अनलॉक करू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या :


Anant Ambani Watch : मार्क झुकरबर्गच्या पत्नीला अनंत अंबानीच्या घडाळ्याची भुरळ; किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल