हरवलेला स्मार्टफोन कसा मिळवाल?
स्मार्टफोन हरवल्यानंतर त्यातील डेटा म्हणजेच कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो आणि इतर महत्वाच्या नोट्सही गायब होतात. याचा कुणाकडून गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र अँड्रॉईड युझर्सना गूगलकडून अशी ट्रॅकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा फोनही परत मिळवता येईल, त्यातील डेटा डिलीट करता येईल किंवा फोन लॉक करता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान मोबाईलचा IMEI क्रमांक असेल तर फोन शोधणं आणखी सोपं आहे. एखादा व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं सिम टाकत असेल तर तुम्हाला अल्टरनेट फोन नंबरवर त्वरित मेसेज येतो.
ट्रॅकिंग केल्यानंतर त्यामध्ये फोनवर रिंग देणे, त्यातील डेटा डिलीट करणे असे पर्याय दिसतील. तुमचा फोन तुम्ही ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लॉकही करु शकता.
डेस्कटॉपवर तुमचा मोबाईल निवडावा लागेल. त्यानंतर ट्रॅकर आपोआप तुमचा फोन ट्रॅक करेल.
फोन हरवल्यानंतर कम्प्युटरवर गूगल अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर लॉग ईन करावं. लॉग इन केल्यानतंर गूगल अकाऊंट सिंक्रोनाईज करावं.
तुमचा फोन तुमच्या गूगल अकाऊंटसोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 'अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर' हा ऑप्शन चालू ठेवावा. (सेटिंग>सिक्युरिटी>अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर)
सध्या जवळपास सर्व अँड्रॉईड फोनमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम उपलब्ध आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -