Aadhaar Card : Aadhaar Card  हे सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. बँकेत खाते ( Aadhaar Card photo Update) उघडण्यापासून ते सिम खरेदी आणि मुलांच्या प्रवेशापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डवरील फोटोवरुन अनेक जोक्स व्हायरल होतात. कधी तर तुमचे मित्र तुमच्या आधार कार्डवरचा फोटो पाहून हसतदेखील असतील.  जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा फोटो चांगला नाही तर तुम्ही तो बदलू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे, हे आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत आणि काही स्टेप्समध्ये सांगणार आहोत. 


ऑनलाईन फोटो बदलू शकणार नाही!



-जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचेचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला हे काम ऑफलाईन करून घ्यावे लागेल. 
-ऑनलाइन फोटो अपडेट करण्याची सुविधा नाही.
-यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDAI  वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागेल  uidai.gov.in. यानंतर तुमचा आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.
-हा फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरा आणि आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाऊन सबमिट करा.
-यानंतर तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स तपासले जातील. कन्फर्मेशन झाल्यानंतर तुमचा दुसरा फोटो काढला जाईल. 
-यासाठी तुम्हाला 100 रुपये भरावे लागतील.


नवा फोटो असलेलं आधार कार्ड कसं डाऊनलोड कराल?


-आपण ऑनलाइन डाउनलोड करू शकता
-कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्ही ते ऑनलाइनही डाऊनलोड करू शकता. 
-यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनMy Aadhaar चा पर्याय निवडा.
-यामध्ये तुम्हाला Download Aadhaar करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
-क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यात मागितलेली माहिती भरा. 
-कॅप्चा भरा आणि Send OTPच्या पर्यायावर क्लिक करा. 
-यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी मिळेल.
-हा ओटीपी टाका. मास्क केलेले आधार मिळविण्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करा.
-आता Verify & Download वर क्लिक करून आपल्या आधारची PDF डाऊनलोड करा.


फोटो बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही


आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड घ्यावे लागेल आणि जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आधारमध्ये फोटो अपडेट करण्याच्या प्रक्रियेला 90 दिवस लागू शकतात. आधार पावतीमध्ये दिलेल्या URN चा वापर करून आपण ऑनलाइन आधार अपडेट तपासू शकता.


इतर महत्वाची बातमी-


OnePlus Nord N30 SE : वनप्लसने लाँच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; मिळणार 5000 एमएएच बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा