Gemini AI Tool: गुगलने आपले नवीन AI Tool Gemini AI लाँच केले आहे. Open AI च्या Chat GPT ला टक्कर देण्यासाठी कंपनीने हे Tool तयार केले आहे. या Toolचे वैशिष्ट्य म्हणजे हे मेसेज, फोटो, ऑडिओ  हे अनेक प्रकारचे टास्ट एकाच वेळी पूर्ण करु शकणार आहे. गुगलच्या लेटेस्ट पिक्सल डिव्हाइसमध्ये कंपनीचे नवे AI मॉडेल उपलब्ध झाले आहे. जर तुम्ही पिक्सल 8 प्रो वापरत असाल तर तुम्ही हे AI Tool वापरू शकता. हे टूल जगातलं सगळ्या पावरफुल AI टूल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे टूल माणसासारखा विचार करु शकेल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. कसं आहे हे टूल?, पाहुयात..


 


या फोनमध्ये मिळेला सपोर्ट 



गुगल पिक्सल 8 Pro मध्ये Gemini AIचे नॅनो व्हर्जन मिळेल. सध्या तुम्ही या टूलच्या मदतीने 2 गोष्टी करू शकाल. सर्वप्रथम हे टूल तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये पुढे काय रिप्लाय द्यायचे हे सुचवेल. दुसरा रेकॉर्डर अॅपमध्ये तुम्हाला समरी कळेल. यामुळे तुमही माहिती लीक होणार नाही आणि मोबाईलदेखील सुरक्षित राहिल. रेकॉर्डर अॅप आता 28 नवीन भाषांमध्ये ट्रान्सक्रिप्शन करते.


जीबोर्डमध्ये जेमिनी नॅनोचा सपोर्ट


जीबोर्डमध्ये जेमिनी नॅनोचा सपोर्टही येत आहे. यामध्ये युजर्सला स्मार्ट रिप्लाय ऑप्शन मिळेल जो युजर्सला चॅटदरम्यान पुढे काय रिप्लाय द्यायचा आहे हे सांगेल. सध्या हे फीचर फक्त व्हॉट्सअॅपसोबत काम करेल, जे 2024 पासून इतर अॅप्ससोबतही काम करेल. जेमिनी योग्य रिप्लाय देतील, असा दावा कंपनीने केला आहे. 



Gemini AI ची निर्मिती कोणी केली?


गुगल आणि गुगलची पॅरेंट कंपनी Alphabet माध्यमातून जेमिनीची निर्मिती करण्यात आली होती आणि कंपनीचे आजवरचे सर्वोत्कृष्ट एआय मॉडेल म्हणून ते जारी करण्यात आले आले.Google DeepMind नेदेखील  Gemini AI तयार करण्यात मोठी कामगिरी बजावली आहे.


 


गुगल जेमिनीचे आणखी व्हर्जन आहेत का?



गुगलच्या डेटा सेंटरपासून ते मोबाइल डिव्हाइसपर्यंत प्रत्येक गोष्टीवर हे टूल काम करणार आहे. प्रत्येक गोष्टीवर उत्तम काम करण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारात हे टूल लाँच करण्यात आलं आहे. Gemini Nano, Gemini Pro, आणि Gemini Ultra अशी या टूलची नावं आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


iPhone Spam Call : आयफोनवरील स्पॅम कॉलची भानगडच संपणार, सेटिंग्जमध्ये करा 'हे' छोटे बदल