UPI Apps Alert : जर तुम्ही यूपीआय ॲप्स वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे (Google pay), पेटीएम (paytm), फोनपे(Phone pay)आणि भारतपे (Bharat Pe) सारख्या सर्व यूपीआय पेमेंट ॲप्सना इनॲक्टिव्ह युपीआय खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या वर्षभरापासून यूपीआय आयडीचा वापर केला नाही त्यांची यूपीआय खाती बंद करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करणार आहे.
हा निर्णय का घेण्यात आला?
TRAI च्या आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) 90 दिवसांनंतर दुसऱ्या युजरला डिॲक्टिव्हेटेड सिमकार्ड देऊ शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने 90 दिवस नंबर वापरला नाही तर, तो दुसऱ्या व्यक्तीला उपलब्ध होईल. समस्या अशी आहे की जेव्हा तोच नंबर बँकेशी जोडला जातो आणि वापरकर्त्याने आपला नवीन नंबर बँक खात्यासह अपडेट केला नाही. जर अपडेट केला असेल तर काहीही समस्या येत नाही मात्र अपडेट केला नसेल तर ते य़ुपीआय आयडी बंद होईल आणि ते खातंदेखील बंद होणार आहे. लोकांना नंबरसंदर्भात कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी NPCI ने यूपीआय ॲप्सना गेल्या वर्षभरापासून डिॲक्टिव्हेटेड असलेली सर्व खाती बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) परिपत्रक टीपीएपी आणि पीएसपीमध्ये बँकांना यूपीआय आयडी, संबंधित यूपीआय नंबर आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ यूपीआय ॲपद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार न केलेल्या ग्राहकांचा फोन नंबर ओळखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनपीसीआयने (NPCI) अशा ग्राहकांचा यूपीआय आयडी (UPI ID) आणि यूपीआय क्रमांक (UPI Numbaer) इनवर्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शनपासून रोखण्यास आणि यूपीआय मॅपरमधून त्यांची नोंदणी रद्द करण्यास सांगितले आहे. इनवर्ड क्रेडिट व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या यूपीआय ॲपसह पुन्हा नोंदणी करणे आणि यूपीआय आयडी लिंक करणे आवश्यक आहे.
BHIM अॅपचा वापर करून UPI अकाउंट असे करा सेट
- सर्वात आधी Google Play Store अथवा Apple App Store वरून BHIM अॅप डाउनलोड करा.
- आता तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा निवडा.
- आता बँक अकाउंटशी रजिस्टर्ड मोबाइल नंबर निवडा.
- आता चार आकडी लॉग इन पासवर्ड सेट करा. अॅपचा अॅक्सेस करण्यासाठी चार आकडी पासवर्डची गरज पडेल.
- आता बँक अकाउंट निवडा आणि त्याच्याशी लिंक करा. तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 आकडे आणि Expiry डेट लिहा व यूपीआय पिन सेट करा.
- यानंतर तुमचे अकाउंट रजिस्टर्ड होईल आणि यानंतर तुम्ही अकाउंटवरून पैसे ट्रांसफर करू शकता.
महत्वाच्या इतर बातम्या :