Instagram Update :  मेटाचे इन्स्टाग्राम (Instagram) जगभरात लोकप्रिय असून या अॅपचे 2 बिलियनहून अधिक युझर्स आहेत. यावर्षी कंपनीने अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत जेणेकरून लोकांचा युजर एक्सपीरियंस सुधारता येईल. दरम्यान, आता कंपनी अॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर जोडणार आहे. इन्स्टाग्राम लवकरच कंपनी प्रोफाइल शेअर करण्याचा पर्याय देणार आहे. म्हणजेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तुम्ही तुमचे किंवा इतर कोणाचे प्रोफाईल शेअर करू शकाल.


सध्या अॅपमध्ये स्टोरी शेअरचा पर्याय आहे, पण तो क्यूआर कोडच्या स्वरूपात येतो, ज्यामुळे युजर्सना त्रास होतो. नवीन फीचर आल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाईल शेअर करू शकाल आणि युजर्स थेट तुमच्या प्रोफाईलवर टॅप करून पोहोचू शकतील. याचा फायदा क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्सना होईल आणि त्यांचे फॉलोअर्स वाढतील.


इन्स्टाग्राममध्ये नवे फीचर



इन्स्टाग्रामने काही काळापूर्वी युजर्सना 'Add Yours' नावाच्या कस्टमाइज टेम्पलेटचा पर्याय दिला आहे. म्हणजे कथेत तुमच्या कथेव्यतिरिक्त इतर कोणताही टेम्पलेट तुम्ही स्वत:नुसार सेट करू शकता आणि Add Yours  च्या माध्यमातून तुमचे फॉलोअर्सही त्यात सहभागी होऊ शकतात. म्हणजेच ते आपले फोटो वगैरे ही पोस्ट करू शकतात. जर तुम्ही फॉलोअर्ससाठी टेम्पलेट कस्टमाइज करण्याचा ऑप्शन ऑन केला असेल तर ते आपल्या स्टोरीमध्येही ते बदलू शकतात. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेलवर या अपडेटची माहिती शेअर केली आहे. हे फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध आहे.



इंस्टाग्रामवरुन रिल्स कसे डाऊलनोड कराल?



इन्स्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे, आपण जागतिक स्तरावरील सार्वजनिक रील त्यांच्या अकाऊंटवरून डाउनलोड करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाउनलोड केलेल्या रील्स थेट कॅमेरा रोलमध्ये किंवा गॅलरीत येतील. हे फीचर सुरुवातीला जूनमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते पण आता डाऊनलोडचा पर्याय पब्लिक रील्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे फीचर आयओएस तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असेल.त्यामुळे आता आपल्याचा हवं ते रील डाऊनलोड करता येणार आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकमध्ये असे फीचर देण्यात आला होता. यामध्ये युजर्सला शेअर बटणाच्या खाली डाऊनलोडचा पर्याय मिळत होता. मात्र खऱ्या निर्मात्यांच्या रील्सचा गैरवापर कोणीही करू शकतात त्यामुळे गॅलरीत सेव्ह केलेल्या रील्स वॉटरमार्कने दाखविण्यात येणार आहेत. यात क्रिएटर्सच्या इन्स्टाग्राम युझरशिपचा समावेश असेल.


इतर महत्वाची बातमी-


New Mobile Launch In 2024 : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार 5 स्मार्टफोन्स; जाणून घ्या डिटेल्स