Google Meet Update :  तुम्ही मीटिंग किंवा अभ्यासासाठी गूगल मीट ( Google Meet ) वापरत असला तर तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. आता तुम्हाला व्हिडीओ कॉलमध्ये एक महत्वाचे फिचर मिळणार आहे. Google ने Google Meet मध्ये असे एक फिड अॅड केले आहे. या फिचरमुळे तुमचा व्हिडीओ कॉल सुरू असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवश्यकतेनुसार बॅकग्राऊंड बदलू शकाल. इतकंच नाही तर तुम्हाला त्यातील थीम देखील बदलता येणार आहे. यासाठी गुगलच्या मालकीची अमेरिकन टेक कंपनी अल्फाबेटने 360-डिग्री व्हिडिओ बॅकग्राउंड फीचर लाँच केले आहे.


Google ने iOS आणि Android दोन्हीसाठी मोबाईलवर Meet वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन 360-डिग्री व्हिडिओ बॅकग्राउंड लाँच केले आहेत. मोबाइलवरील वापरकर्ते अनेक नवीन 360-डिग्री व्हिडीओ बॅकग्राउंडचा वापर करू शकतात, असे Google ने वर्कस्पेस अपडेट्स ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. गूगलकडून देण्यात आलेल्या या फिचरमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला समुद्रकिनारा आणि मंदिरांचा देखील सवावेश करण्यात आला आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या जायरोस्कोपचा वापर करून या नव्या फिचरचा अनुभव घेता येणार आहे. हे फिचर सर्व Google Workspace आणि वैयक्तिक Google खाते वापरकर्त्यांसाठी Android आणि iOS वर उपलब्ध असल्याचे कंपनीने सांगितले आहे.   


गूगलने दिलेल्या माहितीनुसार,  हे सर्व वर्कस्पेस वापरकर्त्यांसाठी आणि वैयक्तिक Google खाती असलेल्या वापरकर्त्यांसाठी Android आणि iOS डिव्हाइसवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त टेक जायंटने आणखी एक अपडेट देखील आणले आहे. यासह वापरकर्ते चॅट अॅप्सवरून पाठवलेल्या माहितीमध्ये त्वरीत बदल करू शकतील, जसे की टास्क कार्डवरील तारीख बदलणे आणि कार्डवरील पर्यायांची निवड रद्द करणे. नवीन फिचरमध्ये मीटिंग रेकॉर्डिंग अधिक उपयुक्त आणि मीटिंग सहभागींना प्रवेश करण्यायोग्य बनविण्यात मदत करेल. 


दरम्यान, गूगलने दोन आठवड्यापूर्वीच आणखी  दोन फिचर लॉंच केली आहेत. यामध्ये यूजर्सना ऑफिस मीटिंगच्या वेळी इतर नवीन सुविधा पाहायला मिळतील. प्रेझेंटेनदरम्यान वापरकर्ते आपला कंटेंट सहजपणे शेअर करू  शकतील. हा कंटेंट मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला पाहता येणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना फ्लोटिंग मेनू पर्याय वापरावा लागेल. याशिवाय तुम्ही कोणतीही फाईल, लिंक किंवा कंटेंट शेअर केल्यास ते नोटिफिकेशनद्वारे लोकांना मिळेल.


महत्वाच्या बातम्या


Facebook Blue Badge: मार्क झुकरबर्गही इलॉन मस्कच्या वाटेवर! फेसबुकवर ब्ल्यू टिकसाठी आता ट्विटरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार