Facebook Blue Tick: ट्विटरप्रमाणेच आता फेसबुकनेही आपल्या ग्राहकांसाठी व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा आणली आहे. फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. लवकरच ग्राहकांना ब्लू टिक सेवेसाठी फेसबुकला पैसे द्यावे लागतील.


रविवारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  यांनी फेसबुक (Facebook) पोस्टद्वारे सबस्क्रिप्शन सेवेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत, ही की सबस्क्रिप्शन सेवा तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करून सुरु करू शकाल.'' झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  यांच्या म्हणण्यानुसार, आता ग्राहकांना ब्लू टिक (Facebook Blue Tick) आणि बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थेट या सेवेचा लाभ घेऊ शकतात. ते म्हणाले की, हे नवीन फीचर फेसबुकच्या सेवांमध्ये प्रमाणीकरण सुरक्षा वाढविण्याबाबत आहे.


Facebook Blue Tick: फेसबुक ब्लू टिकसाठी किती पैसे द्यावे लागतील?


मेटा व्हेरिफाईड सेवेची घोषणा करताना झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  यांनी युजर्सना किती रक्कम खर्च करावी लागेल हे देखील सांगितले आहे. झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  यांच्या  म्हणण्यानुसार, वेब-आधारित व्हेरीफिकेशनसाठी युजर्सला दर महिन्याला 11.99 डॉलर्स ( 992 रुपये) आणि iOS वरील सेवेसाठी 14.99 डॉलर्स (1240 रुपये) दरमहा द्यावे लागतील.


Facebook Blue Tick: सर्वात आधी कुठे सुरु होईल ही सेवा?


मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटा व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी सुरू केली जाईल. लवकरच ही सेवा इतर देशांसाठीही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकची (Facebook) ही सेवा भारतात कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.



Facebook Blue Tick: ट्विटरपेक्षा फेसबुकची ब्लू टिक महाग


दरम्यान, ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्कने (elon musk) वेगवेगळ्या देशांमध्ये ब्लू बॅजसाठी वेगवेगळे शुल्क ठेवले आहे. भारतात तुम्ही 900 रुपये खर्च करून ट्विटरची ब्लू टिक (Facebook Blue Tick) मिळवू शकता. तर झुकरबर्ग यांनी अलीकडेच त्यांच्या  सेवेसाठी दिलेले दोन दर 900 रुपयांपेक्षा जास्त आहेत. मात्र भारतीय यूजर्सना फेसबुक (Facebook) ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार? हे येत्या काही दिवसांत कळेल.    


इतर महत्वाची बातमी:


Hasan Mushrif on Amit Shah : आमदार हसन मुश्रीफ अजित पवारांसह अमित शाह यांची भेट घेणार; म्हणाले, "या भेटीमध्ये आम्ही त्यांना..."