Highest paying big tech firms : आजकाल इंजिनिअरिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याचदा इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या तरूणांना एकतर चांगल्या पगाराची नोकरी मिळते किंवा मग खूपच कमी पगाराची. पण आता एका अहवालात एक टेक कंपन्यांविषयी भन्नाट माहिती समोर आली आहे. Google आणि Meta या  दोन कंपन्या इतर टेक कंपन्यांपेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त पगार देतात. तर Apple आणि Microsoft कंपन्या  फ्रेशरला कमी पगार देतात. मात्र कामाच्या अनुभवाप्रमाणे कालांतराने कर्मचाऱ्यांना जवळजवळ समान पगार दिला जातो.


एका वृत्तानुसार, इतर कंपन्यांच्या तुलनेत अॅमेझॉनमध्ये प्रमोशन देण्याचे प्रमाण कमी आहे, पण इथे इंजिनिअर्सना चांगले पैसे दिले जातात. हा डेटा गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 पासून या महिन्यापर्यंतचा आहे. Google खालच्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीला उच्च स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त पगार मिळणे कठीण आहे. पण Google च्या तुलनेत मेटा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन लवकर आणि जास्त प्रमाणात दिले जाते. 


Microsoft कंपनीत इंजिनिअर्सकरता अनेक जागा


एका रिपोर्टनुसार Microsoft कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर्सकरता अनेक जागा आहेत. मात्र इतर कंपन्याच्या तुलनेत या कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर्सच्या जागा कमी भरल्या जातात. पण त्या मोजक्या कर्मचाऱ्यांना पगार चांगला दिला जातो. 


तर काही दिवसांपूर्वी Google ने भारत आणि जपानमधील यूजर्ससाठी आपल्या सर्च टूलमध्ये जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सादर केले आहे. गुगलने त्यामध्ये काही फीचर्सचा समावेश केला आहे. ज्यामुळे सर्च पूर्वीपेक्षा अधिक सहज आणि स्मार्ट होईल असं कंपनीचं म्हणणं आहे.


हे वैशिष्ट्य कसे वापराल?


ही सेवा सर्वात आधी सर्च लॅबद्वारे अॅक्टिव्ह करावी लागेल. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.


सर्वात आधी Google.com वर जा.


स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला सर्च लॅब चिन्ह शोधा.


त्यानंतर त्यावर क्लिक करा. यानंतर SGE, जनरेटिव्ह AI in Search संबंधी एक पॉप-अप दिसेल.


त्याच्या शेजारी दिलेले टॉगल बटण चालू करा.


हे कसे मदत करेल?


या नवीन वैशिष्ट्यासह, यूजर्स आपला सर्चिंग अनुभव सुधारण्यास सक्षम असतील. भारतातील यूजर्स इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये सहजपणे स्विच करू शकतील. या अंतर्गत, तुम्ही ऑडिओ स्वरूपात देखील ऐकू शकता. Google Search हे जगातील अग्रगण्य सर्च इंजिनपैकी एक आहे, ज्याचा वापर जगभरातील लोक विविध प्रकारची माहिती, वेबसाईट, फोटो, व्हिडीओ, बातम्या आणि इतर कंटेंट शोधण्यासाठी करतात. Google चे AI सर्च टूल आता भारतीय आणि जपानी यूजर्सना एक चांगला अनुभव देईल. 


इतर महत्वाच्या बातम्या