मित्रांनो, कल्पना करा... तुम्ही एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला आहात. समोर बसलेला साहेब तुम्हाला विचारतो, 'तुमचा ईमेल आयडी काय आहे?' आणि तुम्हाला सांगावं लागतं— 'क्यूट_पप्पू_९९-ॲट-जीमेल-डॉट-कॉम'... किती लाजिरवाणं वाटेल ना? 

Continues below advertisement

पण आता टेंशन घेऊ नका, कारण 2026 पासून तुमचा इमेल आयडी बदलता येणार आहे. गुगलने एक नवीन फिचर्स सुरू केलंय, तेच आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात.

 

Continues below advertisement

सध्याचा नियम असा आहे की, जर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी बदलायचा असेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट उघडावे लागते. यामुळे जुने ईमेल आणि डेटा ट्रान्सफर करण्याची मोठी कसरत करावी लागते. पण गुगल एका अशा सिस्टमवर काम करत आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा जुना ईमेल अॅड्रेस बदलू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला नवीन अकाउंट उघडण्याची गरज पडणार नाही आणि तुमचा कोणताही डेटा डिलीट होणार नाही!

हे फिचर नक्की कसं चालेल, हे समजून घेऊया:

-तुम्हाला तुमच्या जुन्या अकाउंटमध्येच 'नवीन जीमेल ॲड्रेस' निवडण्याचा पर्याय मिळेल.-एकदा का तुम्ही नवीन ॲड्रेस निवडला की, तुमचा जुना आयडी काम करेल.-तुम्ही नवीन किंवा जुना, अशा दोन्हीपैकी कोणत्याही आयडीने लॉग-इन करू शकाल.-महत्त्वाचं म्हणजे, जुन्या आयडीवर येणारे सर्व मेसेजेस सुरक्षित राहतील आणि आपोआप नवीन आयडीवर दिसतील.

पण थांबा! गुगलने यासाठी काही कडक अटीही घातल्या आहेत

-वर्षातून फक्त एकदाच तुमचा ईमेल आयडी बदलू शकता.-त्यामुळे, जेव्हा तुम्ही नवीन युजरनेम निवडाल, तेव्हा ते खूप विचार करून निवडा!

तर मित्रांनो, तुम्हालाही तुमचा जुना 'अतरंगी' ईमेल आयडी बदलायचा आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा! आणि अशाच टेक अपडेट्ससाठी पाहत राहा एबीपी माझा