मुंबई: जर तुम्ही कमी किमतीत स्वयंचलित वॉशिंग मशीन (Automatic Washing Machine) शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. येथे आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कोणती वॉशिंग मशीन खरेदी करू शकता हे सांगणार आहोत. याशिवाय आम्ही तुम्हाला काही स्मार्ट टीव्हीबद्दल (Smart TV) देखील सांगणार आहोत जे तुम्हाला थिएटरचा अनुभव देतील. थॉमसन कंपनीने आपला स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीन लॉन्च केले आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने आपले टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे मॉडेल कमी किमतीत सादर केले आहेत. ते तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
Automatic Washing Machine In Budget : वॉशिंग मशीनची वैशिष्ट्ये
या नवीनतम वॉशिंग मशिनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ते 13,999 रुपयांपासून सुरू होतात आणि 15,999 रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. 900 RPM, पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पर्याय, ऊर्जा कार्यक्षम, डिजिटल नियंत्रित डिस्प्ले, ऑटोमॅटिक बॅलेन्स करणे, ऑटोमॅटिक वीज पुरवठा कट ऑफ यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या वॉशिंग मशिनची बॉडी प्लॅस्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि त्यामध्ये शक्तिशाली मोटर बसवण्यात आली आहे. त्यामुळे इतर यंत्रांप्रमाणे गंजू शकत नाही.
थॉमसनचे नवीन स्मार्ट टीव्ही
थॉमसनने त्याच्या QLED, OATH PRO MAX आणि FA मालिका टीव्हीमध्ये नवीन मॉडेल सादर केले आहेत. नवीन 43 इंच QLED, रियलटेक प्रोसेसरद्वारे समर्थित 43 इंच FA मालिका टीव्ही, 4k डिस्प्लेसह 55 इंचाचा Google TV आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनची अगदी नवीन श्रेणी आहे.
थॉमसनने डिस्ने प्लस हॉटस्टार सोबत एक करार देखील केला आहे. ज्यामुळे यूजर्सना क्रिकेट विश्वचषक विनामूल्य पाहता येईल. तुम्ही 27 सप्टेंबर 2023 रोजी BBD स्पेशलमध्ये Flipkart वर हा स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनची खरेदी सुरू करू शकता.
ही बातमी वाचा: