TATA Pay : सध्या आपण कोणतंही पेमेंट करताना थेट कॅश न देता सर्रास गुगल पे(Google Pay), फोन पे (Phone pay) वापरत असतो. गुगल पे , फोन पे वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र आता या ऑनलाईन पेमेंट अॅप्सला टक्कर देण्यासाठी टाटा पे येत आहे. टाटा समूह आता पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये प्रवेश करणार आहे. मोठी गोष्ट म्हणजे टाटा पेला 1 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अॅग्रीगेटर लायसन्सही मिळाले आहे. म्हणजेच आता कंपनी ई-कॉमर्स व्यवहार करू शकते. टाटा पे हा कंपनीच्या डिजिटल युनिट टाटा डिजिटलचा भाग आहे. या माध्यमातून कंपनी डिजिटल व्यवसाय करते. त्यामुळे आता सगळ्या पेसेंमट अॅप्सला टाटा पे टक्कर देण्याच्या तयारीत आहे.


2022 मध्ये टाटा समूहाने आपले डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन लाँच केले होते. आतापर्यंत कंपनी आयसीआयसीआय बँकेच्या पार्टनरशिप  यूपीआय पेमेंट करत होती. टाटा समूहाचा हा दुसरा पेमेंट बिझनेस आहे. यापूर्वी कंपनीकडे ग्रामीण भारतात 'White Label ATM' चालविण्याचा परवाना आहे. इंडिकॅश असे कंपनीच्या या व्यवसायाचे नाव आहे. 


आरबीआयच्या आकडेवारीनुसार टाटाने यापूर्वी प्रीपेड पेमेंट बिझनेस (मोबाइल वॉलेट) मध्येही प्रयत्न केले आहेत. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर कंपनीने 2018 मध्ये आपला परवाना सरेंडर केला. डिजिटल पेमेंट ्स स्टार्टअपचे संस्थापक म्हणाले की, "पेमेंट एग्रीगेटर लाइटसह, टाटा उपकंपन्यांसह सर्व ecommerce व्यवहार करू शकते आणि यामुळे फंड मॅनेज करण्यास मोठी मदत होईल." '


रेझर पे, गुगल पे यांना यापूर्वीच परवाना मिळाला 


रेझरपे, कॅशफ्री, गुगल पे आणि इतर कंपन्यांप्रमाणेच टाटा पेलाही मोठ्या प्रतीक्षेनंतर परवाना मिळाला आहे. PA  लायसन्सच्या मदतीने कंपनीला ऑनलाइन व्यवहार करण्याची परवानगी मिळते. यासोबतच कंपनी फंड हाताळण्याची ही परवानगी देते. टाटा पेव्यतिरिक्त बेंगळुरूच्या DigiO  कंपनीलाही 1 जानेवारी रोजी परवाना मिळाला.


गुगल पे, गुगल पे, पेटीएमचा वापर


गुगल पे (Google Pay) : गुगल पे हे गुगलने विकसित केलेले एक भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टीम अॅप आहे. हे अॅप भारतात सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट अ ॅप आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी गुगल पेचा वापर केला जाऊ शकतो.


फोन पे (Phone pay): फोनपे हे फ्लिपकार्टने विकसित केलेले एक भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अॅप आहे. हे अॅप भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट अॅप आहे. फोनपेचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.


पेटीएम (Paytm): पेटीएम हे पेटीएमने विकसित केलेले एक भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम अॅप आहे. हे अॅप भारतात सर्वाधिक वापरले जाणारे तिसरे पेमेंट अॅप आहे. पेटीएमचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.


इतर महत्वाची बातमी-


UPI Tap And Pay : QR कोडला सुट्टी मिळणार! UPI टॅप अँड पे सेवा जानेवारीत सुरू होणार, जाणून घ्या कसे काम करेल?