iPhone Update : सध्या अनेकजण आयफोन वापरतात. आयफोनला दर (iphone Update) काही महिन्यांनी अपडेट येतं. नव्या फिचर्ससह हे अपडेट येत असल्याने अनेक आयफोन युजर्स लगेच फोन अपडेट करुन नवे फिचर्स वापरत असतात. मात्र तुम्ही जर आयफोन अपडेट करायचा विचार करत असाल तर दोन मिनीटं थांबून ही बातमी नक्की वाचा. Apple ने काही दिवसांपूर्वी iPhone वापरकर्त्यांसाठी नवीन OS अपडेट जारी केलं होतं. मात्र हे अपडेट केल्यानंतर अनेकांना नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीची समस्या येत आहे. तुम्हालाही हिच समस्या येत असेल तर ही ट्रिक वापरुन बिनधास्त आयफोनचं नवं अपडेट वापरु शकता.


उपडेट करताच येऊ शकतात 'या' समस्या!


Apple ने गेल्या वर्षी आयफोन युजर्स iOS 17.2.1 अपडेट आलं होतं. बॅटरीची समस्या दूर करण्यासाठी कंपनीने हे अपडेट आणलं  होतं पण यामुळे युजर्सच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. खरंतर iOS 17.2.1 अपडेट केल्यानंतर अनेक यूजर्सना कॉलिंग आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत आहेत. अँपलच्या सपोर्ट कम्युनिटी पेजवर एका यूजरने लिहिले की, त्याने अलीकडेच त्याचा फोन नवीन OS वर अपडेट केला आहे, त्यानंतर फोनवरील नेटवर्क गायब झाले आहे. युजरने त्याचा आयफोन रीस्टार्ट करून देखील तपासले परंतु फोन नेटवर्कशी कनेक्ट झाला नाही. आयफोनवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता पण आता ते काम करणार नाही असं दिसतं, अशी प्रतिक्रिया युजरने दिली आहे. 


 


तुम्हालाही या समस्या येत असतील तर ही ट्रिक फॉलो करा!


Phonearena च्या रिपोर्टनुसार, Apple 17.2.2 किंवा 17.3 अपडेट ही समस्या दूर करू शकते. सध्या ज्या लोकांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत आहेत ते कंपनीच्या iOS 17.3 बीटाशी कनेक्ट होऊ शकतात. जर तुम्हाला बीटा आवृत्ती वापरायची नसेल, तर आमचा सल्ला आहे की, तुम्ही फोनचे नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा आणि ते रीस्टार्ट केल्यानंतर पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.


Iphone 15 मध्ये हिटची समस्या


या फोनमध्ये  USB Type-C पोर्ट दिलं असल्याने अनेकांनी या फोनला पसंती दर्शवली. मात्र चार्जर विकत न घेता आपल्या जुन्या फोननेच अनेक लोक आयफोन 15 चार्ज करताना दिसत आहे. मात्र हे करणं धोकादायक ठरत असल्याचं आता समोर आलं आहे. आयफोन 15 चार्ज करताना एका युजरचा हात भाजला आहे आणि फोनदेखली खराब झाला आहे. हे नेमकं कशामुळे घडलं? पाहुयात...


GizmoChina च्या रिपोर्टनुसार, Foshan मधील Apple Store ने USB-C केबल वापरणार्‍यांना सावध राहण्यास सांगितले आहे. स्टोअर कर्मचार्‍यांनी ओव्हर हिटिंगबद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या चार्जिंग पिनमुळे लोक वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करत असल्याचे दिसून आले आहे. अँड्रॉईड केबल वापरल्यामुळे फोन जास्त गरम होत असल्याचे सांगितले जाते.


हे देखील वाचा:


Iphone 15 Heat Issue : पैसे जमवून iPhone घेतला पण चार्ज करताना हातच भाजला, नेमकं काय घडलं?