Apple First Official Store in mumbai: मुंबईत देशातील पहिल्या अधिकृत अॅपल स्टोअरचं (Apple Store) लाँचिंग करण्यात येणार आहे. हे स्टोअर 20,000 स्क्वेअर फूटच्या परिसरात पसरलेले असून मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीपासून प्रेरणा घेऊन सुंदर डिझाईन करण्यात आले आहे. आज,18 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईकरांसह देशातील सर्व ग्राहकांसाठी स्टोअर खुल्लं असणार आहे. यासाठी भाषांची माहिती असणारे 100  सदस्यांची टीम काम करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह देशातील सर्व अॅपल ग्राहकांना चांगली ग्राहक सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी अॅपलने जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलसोबत (jio world drive mall Bkc) 11 वर्षाचा भाडेकरार केला आहे. पुढील महिन्यात दिल्ली साकेत येथे रिटेल स्टोअरल सुरू करणार आहे.


देशात वाढणारा मध्यमवर्ग आणि अॅपलची प्रोडक्टची वाढती मागणी पाहता सुरूवातीपासून अॅपलसाठी भारत एक मोठी बाजारपेठ राहिला आहे. आज भारतात बऱ्याच जणांच्या हातात सहज अॅपलचे प्रोडक्ट्स नजरेस पडतात. त्यामुळे अॅपलच्या ग्राहकांची बऱ्यापैकी चांगली आहे. तसेच अॅपलची लोकांत असणारी विश्वासार्हता ग्राहकसंख्या वाढण्यासाठी मोठा सपोर्ट होणार आहे. गेल्या वर्षी अॅपलने भारतातून चांगल नफा कमावला होता. ह्या वर्षीही कंपनी जास्तीचा नफा कमावण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनीने मुंबईच्या बीकेसी (bkc in mumbai) आणि पुढील आठवड्यात दिल्लीच्या साकेत येथे  दुसरे अॅपल स्टोअर ओपन करणार आहे.


अॅपलचे सीईओ टिम  (Tim cook ) कूक पंतप्रधान मोदींची (pmmodi) भेट घेणार


मुंबईतील बीकेसीमध्ये अॅपलचे पहिले अधिकृत रिटेल स्टोअर सुरू होणार आहे. तर पुढील आठवड्यात दुसरे अधिकृत स्टोअर दिल्लीच्या साकेत सिटी वॉकमध्ये सुरू करण्यात येणार आहे. हे रिटेल स्टोअर 10,000 स्क्वेअर फूटाच्या परिसरात पसरलेले आहे. एका रिपोर्टनुसार, अॅपल सीईओ टिम कूक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच टिम कूक भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरबाबत प्रचंड उत्साहित असल्याचं सांगितले आहे. भारतात सांस्कृतिक वैविध्य आणि आश्चर्यचकीत करणारी ऊर्जेच्या लोकांची उपलब्धता आहे. तसेच जगभरातली लोकांपर्यंत अॅपलचे प्रॉडक्ट्स पोहोचवणे आणि त्यांचं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याचा अॅपलचा उद्देश्य असल्याचं टिम कुक यांनी रिपोर्टमध्ये सांगितल्याचं समजतं.


11 वर्षाचा भाडे करार


अॅपलने मुंबईतील बीकेसीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये रिटेस स्टोअर सुरू करणार असून जिओ मॉलसोबत 11 वर्षाचा करार केला आहे. या करारानुसार, अॅपल स्टोअरच्या आसपास काही ब्रॅंड्सना आपले स्टोअर किंवा प्रमोशन करणारं कोणतही पोस्टर लावू शकणार नाहीत. या रिटेल  स्टोअरसाठी अॅपलकडून महिन्याला 42 लाख रूपये भाडे देणार आहे. यासोबत प्रॉफिटचा काही भाग स्टोअरच्या ओनरसोबत शेअर करणार आहे. हे स्टोअर मुकेश अंबानी यांच्या मालिकीच्या जिओ मॉल येथे सुरू करण्यात येणार आहे.