फेसबुक चॅटिंग, अपहरण आणि 11 लाखाची खंडणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण तरुणींच्या नावचे फेसबुकवर फेक आयडी तयार करून ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात आडकवत. अन त्यानंतर त्यांचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी वसूल करीत.
या तरुणीने एकेदिवशी मनीषला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या तरुणीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या मनीषनेही याला होकार दिला. त्यानुसार दोघांच्याही सहमतीने भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरले.
बिहारमधील बेगुसराय शहरातील मनीष कुमार याचे फेसबुक चॅटिंगमुळे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून ११ लाखांची खंडणी वसूलण्याचा प्रकार घडला आहे.
ठरल्या वेळेनुसार मनीष आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी गेला. पण त्या ठिकाणी त्याची गाठ पडली काही भामट्यांशी झाली. त्या भामट्यांनी मनीषचे अपहरण करून, त्याच्या कुटुंबियांकडून 11 लाखांची खंडणी मागितली.
फेसबुकवरून ज्या तरुणीशी मनीषची ओळख झाली होती. वास्तविक, त्या नावची कोणतीही तरुणी अस्तित्वात नसल्याचे या अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितले.
घाबरलेल्या मनीषच्या कुटुबीयांनी पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या भामट्यांना अटक केली. यानंतर त्यांच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले.
मनीषला इंटरनेट आणि फेसबुक चॅटिंगचे प्रचंड वेड होते. फेसबुकवरच त्याची एका तरुणीशी मैत्री झाली, आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनीही आपले प्रेम फेसबुक चॅटिंगनेच व्यक्त केले.
त्या तरुणीने एक दिवस मनीषकडे त्याचा मोबाइल नंबर मागितला. मनीषनेही तिला तत्काळ आपला मोबाइल नंबर दिला. या नंतर दोघांचेही रोज फोनवरून बोलणे सुरु झाले. यातून मनीषने आपली सर्व माहिती त्या तरुणीला सांगितली.
तुम्ही जर फेसबुकवरून दिवसभर चॅटिंग करीत असाल तर सावधान! कारण, फेसबुकच्या चॅटिंगच्या माध्यमातून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत, त्याचे अपहरण करून त्या तरुणाच्या कुटुंबियांकडून खंडणी वसूल करण्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे.