आता सीम न बदलता देखील तुम्ही कॉल करू शकता
अमेरिका आणि युरोपातील ड्यूल सीमच्या घटत्या प्रमाणामुळे गूगल प्ले स्टोअरने हे नवे अॅप लाँच केले आहे.
आता तुम्ही सीम न बदलतादेखील तुमच्या मोबाईलमधील दुसऱ्या नंबरवरून कॉल किंवा मॅसेज करू शकता. गूगल प्ले स्टोअरमधील टेक्सटमी आणि अॅपल स्मार्टफोनवरील अॅपल स्टोअरवरील उपलब्ध अॅपलिकेशनमार्फत तुम्ही हे सहज करू शकता.
या अॅपवरून तुम्ही एकच नंबर ऑपरेट करू शकता. जर तुम्हाला एकपेक्षा जास्त नंबरवर मॅनेज करायचे असल्यास तुम्हाला महिन्याला 60 रुपये द्यावे लागतील.
टेक्सटमीमुळे तुम्ही तुमचे वेगवेगळे अकाउन्ट बनवून ते मॅनेज करू शकता. या म अॅपवरून तुम्ही कॉल केल्यास तर संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी आहे. त्या देशाच्या कोडसहीत समोरच्या व्यक्तीच्या मोबईलवर तुमचा नंबर फ्लॅश होईल.
टेक्सटमी या अॅपमध्ये तुम्ही तुमचे नंबर वेगवेगळे रजिस्टर करू शकता. ज्या नंबरवरून तुम्हाला कॉल किंवा मॅसेज करायचा आहे, तो नंबर डिफॉल्ट मोडवर टाकून तुम्ही कॉल किंवा मॅसेज करू शकता.