Neuralink Implants Brain Chip : तुम्ही बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की, मानवी शरीरात चिप बसवल्यावर व्यक्ती रोबोटप्रमाणे (Robot) वागू लागतो. या चिपद्वारे मानवी मेंदूवर (Human Brain) नियंत्रण मिळवता येतं. आता हे खरं ठरणार आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आता नवा इतिहास रचला आहे. एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरालिंकने मानवी मेंदूमध्ये यशस्वीरित्या चिप बसवली आहे, यामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे.


मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप


एका महत्त्वपूर्ण संशोधनामध्ये, एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने मानवी रुग्णाच्या मेंदूमध्ये चिप रोपण यशस्वी केलं आहे. न्यूरोटेक्नॉलॉजी फर्मसाठी हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात आहे. न्यूरालिंक इम्प्लांट केलेल्या पहिल्या रुग्णाला "लिंक" म्हणून ओळखलं जातं आहे. या रुग्णामध्ये यशस्वी चिप रोपण करण्यात आलं असून त्याची प्रकृती ठिक आहे. रुग्ण रोपण प्रक्रियेनंतर बरा होत आहे. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही मोठी बातमी शेअर केली आहे.






चिप ठेवणार मेंदूवर नियंत्रण


एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पहिल्या मानवामध्ये 29 जानेवारीला न्यूरालिंककडून इम्प्लांट करण्यात आले आणि तो रुग्ण आता बरा होत आहे. चिप इम्प्लांटचे सुरुवातीचे परिणाम आशादायक आणि सकारात्मक आहेत. न्यूरालिंक इम्प्लांट म्हणजे एक लहान चिप आहे. हे एक लहान उपकरण आहे. हे उपकरण पाच नाणी एकावर एक ठेवल्यावर त्या आकाराचं आहे. हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूमध्ये बसवण्यात आलं आहे. आता मानवाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असेल. 


न्यूरालिंक काय आहे? (What is Neuralink?)


न्यूरालिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. एलॉन मस्क यांच्यासोबत सात वैज्ञानिकांच्या टीमने न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली. 2016 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. न्यूरालिंक (Neuralink) कडे 400 हून अधिक कर्मचारी आहेत.


प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आठवण


एलॉन मस्क यांनी या नवीन ऐतिहासिक पाऊलानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची आठवण झाली. एलॉन मस्क यांनी X पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''फक्त विचार करून, तुम्ही तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर आणि त्यांच्याद्वारे जवळपास कोणतंही उपकरण नियंत्रित करू शकता. सुरुवातीला या उपकरणाचा लाभ अशा व्यक्तींना मिळेल, ज्यांनी त्यांच्या अवयवांवरील नियंत्रण गमावलं आहे. कल्पना करा की, स्टीफन हॉकिंग स्पीड टायपिस्ट किंवा लिलाव करणाऱ्यापेक्षा जलद संवाद साधू शकतील का? हेच ध्येय आहे.''


मानव आणि AI यांच्यात चांगले संबंध 


एलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षा मानवी क्षमतेच्या सुपरचार्जिंगशी देखील संबंधित आहेत. एएलएस किंवा पार्किन्सन्स सारख्या मज्जासंस्थेसंबंधीच्या विकारांवर उपचार केल्यानंतर, मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील चांगले संबंध साधण्याची कल्पना या चिपच्या आविष्कारातून एक दिवस पूर्ण होऊ शकते.