Earbuds With Name : आजकाल प्रत्येकजण इअरबड्सचा (Earbuds) वापर करताना दिसतोय. बदलत्या टेक्नॉलॉजीसह (Technology) अनेकांनी वायर्ड इअरफोन्स वापरणं सोडून दिलं आहे. आता, प्रत्येकजण इअरबड्स वापरायचे म्हटल्यानंतर अनेकांना ते मित्राच्या घरी किंवा भावंडांशी अनेकदा अदलाबदल होतात. पण, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, ग्राहकांच्या सोयीसाठी, बोट (boAt) कंपनीने इअरबड्सवर कस्टमाईज्ड नावं देण्यास सुरुवात केली आहे. नेमकी ही प्रक्रिया काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


नावासह येणार boAt इअरबड्स


आजकाल बाजारात इअरबड्ससाठी विविध प्रकारचे स्टायलिश केस कव्हर उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला तुमचे नाव इअरबड्स केसवर लिहून हवं असेल तर, त्यासाठी तुम्हाला इअरबड्स कस्टमाईज्ड करणारे लोक शोधावे लागतील. पण बोट तुम्हाला ही सुविधा अगदी सहज उपलब्ध करून देतंय. या ठिकाणी जेव्हा तुम्ही ईअरबड्स खरेदी कराल तेव्हा तुम्ही तुमचं नावंही केसवर लिहू शकता आणि ऑर्डर करू शकता. बोट कंपनीने ग्राहकांसाठी हा नवीन पर्याय उपलब्ध केला आहे.  


'इतके' पैसे मोजावे लागतील



  • यासाठी तुम्हाला बोटच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि स्पेशल रेंज पर्सनलाईज्ड प्रॉडक्ट्सव (Personalised Products) क्लिक करावं लागेल.

  • या ठिकाणी तुम्हाला ज्या इअरबड्सवर तुमचं नाव कस्टमाईझ करून हवं आहे  ते इअरबड्स दिसतील. 

  • या ठिकाणी तुम्हाला जे इअरबड्स हवेत त्यावर क्लिक करा. तुम्हाला बाजूलाच इअरबड्सचे फिचर्स आणि त्याची किंमत दिसेल. त्याचबरोबर 'Make Your Airdopes Personal' हे ऑप्शनसुद्धा दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव लिहिण्याचे ऑप्शन दिसेल. 

  • या ठिकाणी तुमचं नाव टाका आणि पेमेंट करा. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या नावातील लेटर्स हे 12 कॅरेक्टर्सपेक्षा जास्त नसावेत. यासाठी तुमच्या इअरबड्सच्या किंमती व्यतिरिक्त 99 रूपये अधिक द्यावे लागतील. 


boAt चे Nirvana Ion 


या इअरबड्सची मूळ किंमत 7,990 रुपये आहे. पण, तुम्हाला ते बोटच्या अधिकृत पेजवरून 71 टक्के सवलतींसह फक्त 2,299 रुपयांना मिळत आहे. याशिवाय, बड्सच्या केसवर तुमचे नाव लिहिण्यासाठी तुम्हाला अधिकचे 99 रुपये द्यावे लागतील. याशिवाय तुम्हाला इतर अनेक ऑप्शन्स देखील देण्यात येतील. या इअरबड्स व्यतिरिक्त, तुम्ही इतर पर्याय देखील पाहू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता