Samsung Galaxy S23 5G : सध्या अनेक मोबाईल कंपन्या ग्राहकांच लक्ष वेधून घेण्यासाठी बंपर सूट देत आहेत. यामध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनवर सूट देण्यास सुरूवात केली आहे. कंपनी Samsung Galaxy S23 5G च्या हँडसेटच्या खरेदीवर सूट देत आहे. यावर तुम्हाला 17 टक्के सूट मिळत आहे. हा मोबाईल फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना काही भन्नाट फिचर्स मिळणार आहेत. यासोबत सॅमसंगने या स्मार्टफोनच्या किमतीही कमी केल्या आहेत. यामुळे तुम्ही मोबाईल खरेदी  करण्याचा विचार करत असाल, तर Samsung Galaxy S23 5G हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 


डिस्काउंटनंतर किती रुपयांना मिळणार Samsung Galaxy S23 5G स्मार्टफोन? 


तुम्हाला  Samsung Galaxy S23 5G  स्मार्टफोनवर  16 ते 17 टक्के सूट मिळणार आहे. ही सूट मिळाल्यानंतर मोबाईलच्या किमती पुढीलप्रमाणे असतील... 


1. SAMSUNG Galaxy S23 5G (Lavender, 256 GB)  (8 GB RAM)   किंमत : 79,999 रूपये  


2. SAMSUNG Galaxy S23 Ultra 5G (Green, 256 GB)  (12 GB RAM) किंमत : 1,24,999 रूपये 


3. Samsung Galaxy S23 5G (Cream, 8GB, 128GB Storage) किंमत : 74,998 रूपये   


SAMSUNG Galaxy S23 5G  चे फिचर्स


SAMSUNG Galaxy S23 5G स्मार्टफोनमध्ये युजर्सना अनेक भन्नाट फिचर्स मिळणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि  रिफ्रेश रेट 120Hz इतका देण्यात आला आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चा प्रोसेसर दिला गेला आहे. यासोबत ट्रिपल रियर कॅमेरा मिळणार आहे. फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सल, तर सेल्फी कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि  10 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेराही या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. मोबाईलची बॅटरी 3,900mAh इतक्या क्षमतेची असणार आहे. जी 25 वॅटच्या वायर चार्जिंग आणि 15 वॅटच्या वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.  


डिस्काउंट शिवाय एक्सचेंज ऑफरचीही सुविधा 


सॅमसंगने स्मार्टफोनच्या किमतीच कमी केल्या नाहीत, तर इतर अनेक सुविधाही दिल्या आहेत. या मोबाईलच्या खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर आणि बँक बेनिफिट्सही मिळू शकतात. जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल, तर 10 टक्के इतका कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डवरून खरेदी करावी लागेल. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड नॉन ईएमआय, क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड ईएमआय इत्यादी कार्डवरुन डिस्काउंट मिळू शकतो. या कार्डवरून खरेदी केली, तर तुम्हाला 5000 रूपयापर्यंत सूट मिळू शकते. यामुळे तुम्ही जर चांगला मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर SAMSUNG Galaxy S23 5G चांगला ऑप्शन ठरू शकतो.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


प्रतीक्षा संपली! Samsung Galaxy S23 ची विक्री भारतात सुरू; जबरदस्त फिचर्ससह 'ही' असेल किंमत