Huawei Mate XT Price in India: अॅपल कंपनीने 9 सप्टेंबर 2024 रोजी आयफोन 16 सिरीज लॉन्च केली. या आयफोन 16 ची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा होती. आता या फोनचे फिचर्स आणि किंमत आता समोर आली आहे. दरम्यान अॅपलने आयफोन 16 लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही तासांत चीनच्या एका स्मार्टफोन कंपनीने टेक विश्वात खळबळ उडवून दिली. या कंपनीने जगातला पहिला ट्राय फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. किमतीच्या बाबतीत या कंपनीने अॅपल कंपनीच्या फोन्सना मागे टाकलं आहे.
चीमध्ये सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये Huawei या कंपनीचे नाव घेतले जाते. याच कंपनीने जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. म्हणजेच हा फोन दोन न्वहे तर तीन वेळा फोल्ड होऊ शकतो. म्हणजेच तीन वेळा फोल्ड होणारा हा फोन चांगलाच मोठा आहे. भारतासह संपूर्ण जगातील बहुसंख्य लोकांना सॅमसंग, वनप्लस, ओप्पो आदी कंपन्यांचे ड्यूअल फोल्डेबल फोन माहिती आहेत. दोन वेळा फोल्ड होणारे फोन पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण Huawei या कंपनीने थेट तीन वेळा फोल्ड होऊ शकेल असा फोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Huawei Mate XT असे आहे. हा फोन पूर्णपणे खोलल्यानंतर तो एका टॅबप्रमाणे दिसतो. तीन वेळा अनफोल्ड केल्यावर या फोनची स्क्रीन तब्बल 10.2 इंच होते.
फोनची डिझाईन कशी डिस्प्ले कसा आहे?
Huawei Mate XT या फोनमध्ये ट्राय-फोल्डिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. म्हणजेच हा फोन तीन भागांत फोल्ड होतो. अनफोल्ड केल्यानंतर हा स्मार्टफोन लगेच एका टॅबमध्ये बदलत. या फोनमध्ये 6.4-इंची OLED डिस्प्ले आहे. या फोल्ड केलेल्या फोनला तुम्ही एकदा अनफोल्ड केल्यास त्या फोनची स्क्रीन 7.9 इंच होते. त्यानंतर आणखी एकदा हा फोन अपफोल्ड केल्यास या फोनची एकूण स्क्रीन 10.2 इंच होते.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
कंपनीने या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Kirin 9 चिपसेट दिलेला आहे. या फोनचा रॅम 16GB आहे. सोबतच हा फोन 256GB, 512GB आणि 1TB स्टोअरेजच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. गेमिंग तसेच मल्टिटास्किंगसाठी हा फोन वापरता येईल, असा या कंपनीचा दावा आहे.
सॉफ्टवेअर आणि फिचर्स काय आहेत?
Huawei Mate XT या फोनमध्ये EMUI 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या फोनमध्ये गुगल सर्व्हिसेसचा सपोर्ट नाही. मात्र Huawei या कंपनीने स्वत:चे अॅप्स आणि सर्व्हिसेस दिलेल्या आहेत.
फोनचा कॅमेरा कसा आहे?
Huawei Mate XT या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा आहे. यातील मेन कॅमेरा हा 50MP तर 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तिसरा कॅमेरा हा 12MP आहे. सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनला 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.
या फोनची बॅटरी 5600mAh आहे. Huawei Mate XT या फोनची सुरुवातीची किंमत 19,999 CNY (जवळपास 2,810 डॉलर्स) आहे. भारतीय रुपयात सांगायचे झाल्यास या फोनची किंमत तब्बल 2 लाख 35 हजार रुपयांच्या आसपास आहे. पाकिस्तानी रुपयांत सांगायचे झाल्यास हा फोन 7 लाख 82 हजार रुपयांचा आहे. हा फोन सध्यातरी चीनमध्येच उपलब्ध आहे. लवरच तो इतरही देशात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा :
Pune Crime: मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
मोठी बातमी! आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त, तब्बल 'इतक्या' रुपयांनी घट!