Xiaomi India ने 12 सीरीज वाढवत दोन नवीन 4G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने एकाच वेळी दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, ते म्हणजे Redmi Note 12 4G आणि Redmi 12C. दोन्ही 4G स्मार्टफोन आहेत. त्यामुळे दोघांमध्ये 5G नाही हे उघड आहे. परंतु किंमत देखील त्यानुसार ठेवण्यात आली आहे. कंपनी Redmi Note 12 मध्ये 5G सपोर्ट देऊ शकते. कारण या स्मार्टफोनची किंमत जवळपास 15 हजार आहे. Redmi 12C माफक फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसह येतो. दुसरीकडे रेडमी नोट 12 मध्ये AMOLED डिस्प्ले, 33W फास्ट चार्जिंग आणि 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा यांसारखी उत्कृष्ट फीचर्स देण्यात आली आहेत. याच दोन्ही स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Redmi 12C आणि Redmi Note 12 ची किंमत
Redmi 12C चा बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह त्याच्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.
दुसरीकड 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह Redmi Note 12 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच 6GB आणि 128GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपयांना मिळते.
Redmi 12C ची फीचर्स
बजेट डिव्हाइस असूनही Redmi 12C चे डिझाइन खूपच प्रभावी आहे. Redmi 12C मध्ये Helio G85 SoC प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे. फोनचा मोठा दोष म्हणजे यात मायक्रो यूएसबी पोर्ट आहे, तर आता कंपन्या यूएसबी-सी पोर्टकडे वाटचाल करत आहेत. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात 6.7-इंचाचा डिस्प्ले, ड्युअल-सिम कार्ड सपोर्ट आणि Android 12-आधारित MIUI 13 साठी सपोर्ट आहे.
Redmi Note 12 ची फीचर्स
Redmi Note 12 मध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल-एचडी + रिझोल्यूशन आहे. फोन स्नॅपड्रॅगन 685 SoC, 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह येतो. Redmi Note 12 च्या इतर फीचर्समध्ये Android 13, एक हेडफोन जॅक आणि IP53-रेटेड बिल्ड समाविष्ट आहे.
Moto G13 लॉन्च
Motorola ने भारतात नवीन बजेट फोन Moto G13 लॉन्च केला आहे. Moto G13 आधीच जागतिक बाजारात लॉन्च झाला होता. तो आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने हा मोबाईल फोन 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला आहे, ज्याची किंमत फक्त 9,499 रुपये आहे.