न्युरालिंकची चीप या रुग्णाच्या आत बसवली गेली तर अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त असणाऱ्या रुग्णाला ॲमेझॉनच्या अलेक्साला आज्ञा देता येणं शक्य झालंय. या रुग्णांचे विचार त्याला ॲमेझॉन अलेक्साच्या मदतीनं नियंत्रीत करता येऊ शकते. या रुग्णला हाताळण्यासाठी एलॉन मस्कचा प्रकल्प सक्षम असल्याचा दावा या कंपनीनं केलाय. ६४ वर्षीय डिजनरेटिव्ह रोग असलेल्या रुग्ण ॲमेझॉनच्या अलेक्साला आज्ञा देण्यास सक्षम असल्याचं समोर आलंय. तंत्रज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालत ॲमियोट्रॉफिक लॅटरल स्केरोसिसने ग्रस्त झालेल्या अर्धांगवायुचा प्रकार असणाऱ्या या रोगानं ग्रस्त रुग्णांवर केल्या गेलेल्या एका प्रयोगादरम्यान ही गोष्ट समोर आली.


एलोन मस्कया उद्योगपतीची एक कंपनी न्यूरालिंकसाठी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक चिप तयार करण्यासाठी काम करत आहे. ही चिप अर्धांगवायूनं ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या मेंदूला जोडली तर त्या रुग्णाला काय म्हणायचंय हे ॲमेझॉनच्या अलेक्सा असिस्टंटला कळलं आणि ही यंत्रणा अर्धांगवायु असणाऱ्या रुग्णाला मदत करु शकते हे समोर आलं.


64 वर्षीय या रुग्णासोबत काय झालं?


64 वर्षीय व्यक्तीच्या मेंदूच्या पृष्ठभागावर रक्तवाहिनीमध्ये ही चीप इम्प्लांट केल्यानं त्याला मानसिकदृष्ट्या अमेझॉन फायर टॅबलेटवर चिन्ह टॅप करता येतात असे ब्रेन कम्प्युटर इंटरफेस कंपनी सिंक्रोनने म्हटले आहे. ॲमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस) सह जगत असलेला रुग्ण व्हिडिओ कॉल करू शकतो, संगीत प्ले करू शकतो, स्ट्रीम शो करू शकतो, स्मार्ट होम डिव्हाईस जसे की लाईट नियंत्रित करू शकतो, ऑनलाइन खरेदी करू शकतो आणि अलेक्साला निर्देशित करण्यासाठी त्याच्या मनाचा वापर करून पुस्तके वाचू शकतो. 


ब्रेन इम्प्लांटचा वापर करून या रुग्णाल काय करता येणर?


या कंपनीच्या म्हणण्यानुसार, अलेक्साचा वापर करत हा रुग्ण व्हिडिओ कॉल करू शकतो. गाणी ऐकू शकतो. एखादा शो स्ट्रीम करू शकतो. अगदी ऑनलाईन खरेदी करू शकतो. अलेक्साला निर्देश देण्यासाठी त्याच्या मनाचा वापर करून पुस्तके वाचू शकतो. यासाठी ही यंत्रणा काम करू शकते असा दावा करण्यात येतोय.