iPhone 16e Pre-Booking Offers : अॅपलच्या सर्वात परवडणाऱ्या आयफोन 16 ईची प्री-बुकिंग शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळपासून सुरू झाली. भारतात या फोनची विक्री 28 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. आयफोन 16 ई वर अनेक चांगल्या बँक ऑफर्स आणि नो कॉस्ट ईएमआय देखील उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त 2,496 रुपये देऊन हा आयफोन विकत घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही ट्रेड इन ऑफरद्वारे जास्तीत जास्त 67,500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकतात.

आयफोन 16 ईच्या बेस व्हेरिएंटची (128 जीबी) किंमत 59,999 रुपये आहे. तर 256 जीबीची किंमत 69,999 रुपये आहे.512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89,990 रुपये आहे. हा फोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.   Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही iPhone 16e दरमहा 2496 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर घरी आणू शकता. मात्र, ही नो-कॉस्ट EMI ऑफर फक्त निवडक बँक कार्डवरच उपलब्ध आहे. 

पाच हजारांपासून ते 67,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट

अ‍ॅपल ट्रेड-इन ऑफर अंतर्गत तुम्हाला आयफोन 16 ई वर 5,000 ते 67,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, तुम्हाला किती ट्रेड-इन ऑफर मिळेल हे तुमच्या आयफोनच्या मॉडेल, स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल. याशिवाय, Apple नवीन iPhone 16e सह Apple Music, Apple TV+ आणि Apple Arcade चे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. याशिवाय, तुम्ही फोनच्या संरक्षणासाठी Apple Care Plus कव्हर देखील घेऊ शकतात. त्यामुळे आयफोन घेऊ इच्छिणाऱ्यांनी ही सुवर्णसंधी आहे.  

आयफोन 16 ई ची वैशिष्ट्ये  

आयफोन 16 ई आणि आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर (1170x2532 पिक्सेल) ओएलईडी डिस्प्ले आहे. त्याच वेळी, त्याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहे आणि पीक ब्राइटनेस 800 निट्स आहे. आयफोन 16 ई मध्ये A 18 चिपसेट आहे, जो अ‍ॅपल इंटेलिजेंसने सुसज्ज आहे. आयफोन 16 ई मध्ये 48 एमपीचा रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 2 एक्स टेलिफोटो झूम देखील आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही फोटोची गुणवत्ता कमी न करता झूम करून फोटो काढू शकता. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 12 मेगापिक्सेलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

SIM Card Scam : ई-सिम कार्डच्या नावानं आर्थिक फसवणुकीचे प्रकार, लोकांना कसं फसवतात, नुकसान कसं टाळायचं?  

Mutual Fund Rules : 1 एप्रिलपासून म्युच्युअल फंडच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल, गुंतवणुकीवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर