Apple Glowtime Event Live: अनेक दिवसांपासून ॲपलच्या नव्या सिरीजचे लिक रिपोर्ट समोर येत असताना आता जगभरातील Iphone चाहत्यांची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. ॲपलच्या आयफोन 16 (iPhone 16)  सह आणखी 5 प्रोडक्ट लाँच होणार असून ॲपलनं या लाँचींगच्या सोहळ्याला ग्लोटाईम असं नाव दिलंय. या कार्यक्रमात ग्राहकांसाठी कंपनी अनेक घोषणा करणार असल्याचं कळतंय. ॲपलनं पहिल्यांदाच आपल्या आयफोनमध्ये AI चा वापर केलेलं मॉडेल तयार केल्याची माहिती दिली आहे. याशिवाय व्हॉईस असिस्टंट 'सिरी'चंदेखील अपग्रेड होण्याची शक्यता आहे.


ॲपल कंपनी जेव्हा-जेव्हा नवा फोन लॉन्च करते, तेव्हा-तेव्हा तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडते. आता ही कंपनी येत्या 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार आहे. आयफोन 16 (iphone 16) मध्ये नेमकं काय असणार? याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. या फोनला लॉन्च होण्यसाठी काही दिवसांचा अवधी आहे. मात्र हा फोन किती रुपयांना मिळणार? त्यातले फिचर्स काय असतील? हे सामान्यांना जाणून घ्यायचे आहे. आयफोन हे फार महागडे असतात. एका सामन्या माणसाला हे फोन घेणे परवडत नाही. अशा स्थितीत आयफोन 16 ची किंमत नेमकी किती असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या आयफोनची प्रत्येक देशात वेगवेगळी किंमत असेल. त्या-त्या देशातील करप्रणालीनुसार या फोनच्या किमतीत बदल होतो. 


कुठे पहाल ग्लोटाईम सोहळा?


ॲपलचा हा सर्वात मोठा लाँचसोहळा टेक क्षेत्रातला सर्वात मोठा इव्हेंट समजला जात आहे. ॲपलच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल आणि युट्युब चॅनलवर युजर्सला हा ग्लोटाईम सोहळा पाहता येणार आहे. ॲपलच्या आयफोन 16 चे प्रक्षेपण रात्री 10.30 वाजता कॅलिफोर्नियाच्या मुख्यालयातील क्यूपर्टिनो पार्क येथे होणार आहे.


कोणते प्रोडक्ट होणार लाँच?


ॲपलच्या आयफोन 16 सह आणखी 5 प्रोडक्ट लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये Apple Apple Watch Series 10 आणि AirPods 4 देखील येथे लॉन्च केले जाऊ शकतात. या इव्हेंटमध्ये सॉफ्टवेअर अपडेटबाबत मोठी घोषणा होणार आहे. ज्यात iOS 18, iPadOS 18, tvOS 18, watchOS 11, VisionOS 2 आणि macOS Sequoia या सॉफ्टवेअरचा समावेश असेल. 


काय असणार आयफोनची भारतीय बाजारात किंमत?


भारतात, iPhone 16 ची किंमत  79,900 अपेक्षित आहे. Apple iPhone 16 Plus, Pro आणि Pro Max ची किंमत अनुक्रमे  89,900,  1,29,900 आणि  1,39,900 अपेक्षित आहे.


भारतीयांना डिस्काऊंट आहे का?


लेटेस्ट आयफोन 16 सीरीज आणि ऍपल वॉच सीरीज 10 लॉन्च करणार आहे. नवीन डिव्हाइस व्यतिरिक्त, नवीन सॉफ्टवेअर अपडेटची रिलीज तारीख देखील या कार्यक्रमात सांगितली जाणार आहे. याशिवाय हा फोन भारतीयांना कधीपासून मिळणार कोणते डिस्काउंट असणार का? याचीही माहिती समोर येणार आहे.