मुंबई : ॲपल (Apple) कंपनीचा वंडरलस्ट (Apple Event 2023) इव्हेंट आज 12 सप्टेंबर रोजी होत आहे. ॲपलच्या आजच्या इव्हेंटमध्ये (Apple Wonderlust Event 2023) काही नवीन प्रोडक्ट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये बहुप्रतिक्षित ॲपल आयफोन 15 सीरिज (iPhone 15 Series Launch) लाँच करण्यात आली आहे. यासह इतरही काही डिव्हाईसेस लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान, ॲपल कंपनीच्या इव्हेंटचं नाव वंडरलस्ट ठेवण्यामागचं नेमकं कारण काय? वंडरलस्टचा अर्थ काय? याबाबत सविस्तर जाणनू घ्या.


वंडरलस्ट म्हणजे भटकंती किंवा प्रवास करण्याची इच्छा (Strong Desire to Travel) असणे. वंडरलस्ट शब्दाचा वापर ॲपल कंपनीने टेक्नॉलॉजी क्षेत्रातील पुढचा प्रवास या उद्देशासाठी केला आहे. ॲपल कंपनीने आधुनिक काळात नव्या टेक्नॉलॉजी दाखवण्यासाठी वंडरलस्ट हा इव्हेंट आयोजित केला आहे.


Apple iPhone 15 Series Launch : आयफोन 15 सीरिज लाँच


वंडरलस्ट कार्यक्रमात आज आयफोन 15 सीरिज लाँच झाली आहे. यामध्ये आयफोन 15 (iPhone 15), आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus), आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro), आणि आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) चार प्रकारांमध्ये लाँच झाला आहे. हे नवीन आयफोन मॉडेल अनेक सॉफ्टवेअर अपग्रेडसह लाँच करण्यात आले आहेत.


ॲपल कंपनीकडील अपडेट्स


A17 Chip on Pro Models : प्रो मॉडेल्सवर A17 चिप 


आयफोनच्या प्रो मॉडेल्स (Apple iPhone Pro Models) मध्ये कंपनीने A17 चिप समाविष्ट केली आहे. या चिपमुळे आयफोनची बॅटरी दीर्घकाळ चालेल. ही चिप 3-नॅनोमीटर उत्पादन प्रक्रियेवर तयार केली आहे.


Camera : कॅमेरा


ॲपल कंपनीने आयफोनच्या कॅमेरामध्ये थोडा बदल केला आहे. नवीन आयफोन 15 सीरिजमध्ये तीन-कॅमेरा सेटअप कायम ठेवला आहे. पण, आधीच्या मॉडेल्समधील 3X पेक्षा 48-मेगापिक्सेल क्षमता आणि 6X झूम कॅमेरा देण्यात आला आहे


USB-C : यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट


युरोपियन कायद्यानुसार आयफोनच्या चार्जिंग स्लॉटमध्ये बदल करुन USB-C पोर्टमध्ये बदलण्यात येणार आहे. 


'हे' प्रोडक्टही होणार लाँच 


रिपोर्टनुसार, आयफोनशिवाय ॲपल या इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच सीरीज, एअरपॉड्स आणि नवीन ओएसची व्हर्जल लाँच करण्यात येईल. कंपनी iOS 17 आणि watchOS 10 वर अपडेट आणणार आहे. आजच्या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 9 लाँच करण्यात येणार आहे. या वॉचमध्ये अधिक चांगले हार्ट रेट सेंसर आणि U2 चिप देण्यात येईल. ही सीरिज दोन आकारात उपलब्ध असेल, त्यापैकी एक 41 मिमी आणि दुसरी 45 मिमी आहे.