Samsung Galaxy : सॅमसंग प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांना काहीतरी हटके (Samsung) देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असते, आता सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy S24 Ultra सीरिजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. त्यातच या नवीन सीरिजचे काही फीचर्स समोर आलेले आहे. Samsung मोबाईल विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर Samsung Galaxy S24 Ultra चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहेत पाहुयात...
'हे' आहेत काही नवीन फीचर्स
सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, काही नवीन फिचर्स समोर आले आहेत. कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या सिरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील, त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र, यावेळी या सिरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे. दरम्यान, Galaxy S24 Ultra बाबत काही नवीन लीक्स समोर आले आहेत. Galaxy S23 ची कॅमेरा क्वालिटी चांगली असूनही फोटो कधीकधी ओव्हर सॅच्युरेटेड झाल्यामुळे आपल्याला फोटोंमधील रंग मूळ दिसत नाहीत. Galaxy S24 Ultra मध्ये ही समस्या दूर करण्यात आली आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगलं सॅचुरेशन आणि शार्पनेस मिळेल.
स्मार्टफोनमध्ये मिळणार AI फीचर
सॅमसंगच्या नवीन सिरीजमध्ये तुम्हाला AI चा सपोर्ट मिळेल, यामध्ये ईमेल लिहिणे, फोटो जनरेट करणे आणि मजकूराचे ट्रान्सलेशन करणे तसेच Voice Quality यात हे फिचर्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त Galaxy S24 Ultra मध्ये 2600 nits आणि Gorilla Glass Victus 2 ची पीक ब्राइटनेस असल्याचे सांगितलं जातं त्यामुळे हा स्मार्टफोन iPhone 15 Pro Max आणि Google च्या Pixel Pro पेक्षा चांगला असेल, असा दावा केला जात आहे. सॅमसंग 8GB रॅमसह Galaxy S24 आणि 12GB रॅमसह S24 Plus लॉन्च करू शकते.8GB रॅम कमी आहे तरीही AI फिचर मिळत असल्याने अनेक कामं सोपी होणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Gmail आणि गुगल सर्चमध्ये जोडलं नवं फिचर, ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा