मुंबई : 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त पाहिलेला व्हिडिओ म्हणजे चांद्रयान-3 मिशन सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह टेलिकास्ट आहे. जवळपास सात कोटींच्यापेक्षा अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिल्याची माहिती समोर आलीये. युट्युबकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये चांद्रयान - 3 चे थेट प्रक्षेपण सर्वात अव्वल स्थानी आहे. 2023 मध्ये Google च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर भारतीयांनी सर्वात जास्त काय पाहिले आहे याची माहिती समोर आली आहे. YouTube आता जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यावर दर 60 सेकंदाला 500 तासांचा कंटेट अपलोड केला जातो.
दर मिनिटाला लाखो लोक या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि दर मिनिटाला करोडो लोक वेगवेगळे व्हिडिओ पाहतात. चांद्रयानाच्या लाईव्ह टेलिकास्टचा व्हिडिओ एकाच वेळी 8.6 दशलक्ष युजर्सनी पाहिला. YouTube वरील हा एकमेव थेट लाईव्ह होता. ज्यामध्ये एकाच वेळी इतके लोक जोडलेले होते.सध्या या व्हिडिओला 79 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
'हे' व्हिडिओ आहेत ट्रेंडिंग
दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ "मेन ऑन मिशन" आहे. हा व्हिडिओ राऊंड टू हेल चॅनलवरून अपलोड करण्यात आला आहे जो भारतात मजेदार व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. तिसरा, चौथा आणि पाचव्या स्थानी UPSC - Stand Up Comedy Ft. अनुभव सिंग बस्सी, CARRYMINATI आणि सस्ता बिग बॉस 2 द्वारे ब्लॉगर्स आशिष चंचलानीचे व्हिडिओ आहेत.
याशिवाय हर्ष बेनिवाल यांनी दिलेला चेकमेट, संदीप भैया या चॅनेलवरून अपलोड केलेला व्हायरल फिव्हर | नवीन वेब सिरीज | EP 01 | I Stole Supra from Mafia House | GTA 5 Gameplay #151 आणि BB Ki Vines | Angry Masterji Part 16 देखील यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. दहाव्या क्रमांकावर स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युचा आरोग्य Health Anxiety आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
सर्वाधिक पाहिलेले लाईव्ह स्ट्रिमिंग
ISRO Chandrayaan3: 8.06 दशलक्षBrazil vs South Korea: 6.15 दशलक्षBrazil vs Croatia: 5.2 दशलक्षVasco vs Flamengo: 4.8 दशलक्षSpaceX Crew Demo: 4.08 दशलक्ष
यूट्यूबचा (You Tube) वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. Google चे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube एका नवीन वैशिष्ट्याची (New Feature) चाचणी करत आहे जे यूजर्सना प्लॅटफॉर्मवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल न करता खेळण्यास परवानगी देईल. कंपनी Playables नावाच्या फीचरवर सध्या काम करत आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की यूजर्स मोबाईल आणि डेस्कटॉप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर HTML5 आधारित गेम खेळू शकतील.
हेही वाचा :
Gmail Account : 1 डिसेंबरपासून डिलीट होतील 'हे' gmail अकाऊंट्स,आजच तुमचा Gmail Data सेव्ह करा!