मुंबई : अॅपल कंपनीने iPhone 16 सिरीजचे फोन लॉन्च केले आहेत. या फोनची प्री-बुकिंग 13 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. 20 सप्टेंबरपासून या फोनची विक्री चालू होईल. दरम्यान iPhone 16 तसेच iPhone 16 च्या प्रो आणि मॅक्स मॉडेल्सची विशेषता काय आहे? या मॉडेल्समध्ये नवे काय आहे? हे जाणून घेऊ या...
आयफोन 16 सुपरफास्ट
iPhone 16 सिरीजमध्ये A18 Bionic चिपसेट असेल. या सिरीजचे फोन आयफोन 15 च्या तुलनेत दुपटीने फास्ट असतील. आयफोन 16 च्या सिरीजमध्ये 3nm बेस्ड चिपसेट असेल. आयफोन 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅपल इंटेलिजन्सचा सपोर्ट मिळेल. iPhone 16 मध्ये अॅपल इंटेलिजन्स, न्यू व्हाईब्रेंट कलर, 2000 युनिट्स ब्राईटनेस असेल.
iPhone 16 ची स्क्रीन किती?
आयफोन 16 या फोनला 6.1 इंची स्क्रीन असेल. तर iPhone 16 प्लस या फोनची स्क्रीन 6.7 इंच असेल. iPhone 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅक्शन बटन असेल. या अॅक्शन बटनच्या मदतीने तुम्हाला कॅमेरा कंट्रोल करता येणार आहे.
अॅपल इंटेलिजन्सचा सपोर्ट
iPhone 16 सिरीजच्या फोनमध्ये अॅपल इंटेलिजन्स पूर्णपणे विनामूल्य अशेल. या फोनला अनेक भाषांचा सपोर्ट असेल. या फोनमध्ये अॅपल एआय सर्च फोटोचे फिचर असेल. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला डिस्क्रीप्शन देऊ शकाल. तुमचा इमेल समराईज होऊ शकेल.
iPhone 16 फोनचा कॅमेराही इतर आयफोनच्या तुलनेत वेगळा असेल. या फोनमध्ये ड्यूअल कॅमेरा असेल. मेन कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. सोबतच 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असेल. या फोनमध्ये मायक्रो फोटोग्राफीचा सपोर्ट असेल. या फोनमध्ये 60fps वर 4k व्हिडीओ शूट करता येईल. या फोनमध्ये डॉल्बी व्हर्जन सपोर्ट आहे. आयफोन 16 मध्ये फ्यूजन कॅमेरा लेन्स असेल.
आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये काय असेल?
आयफोन प्रो मॉडेलमध्ये 6.3 इंची स्क्रीन असेल. आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 6.9 इंची स्क्रीन असेल. आयफोन 16 चे प्रो मॉडेल एकूण चार कलरमध्ये असेल. यात सॉफ्ट आणि डार्क टायटेनियम कलरही देण्यात आला आहे. आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या दोन्ही मॉडेल्सना अॅफल इंटेलिजन्स सपोर्ट असेल. आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये Apple A18 Pro चिपसेट असेल.
आयफोन 16 प्रो मोबाईलचा कॅमेरा कसा असेल?
आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा असेल. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगा पिक्सेलचा असेल. या कॅमेऱ्याची फोकल लेंथ ही 24mm असेल. या फोनमध्ये एक अल्ट्रा वाईड कॅमेरा असेल. याची फोकल लेंथ 13mm असेल. या फोनमध्ये फोटो काढताना कलर ग्रेडिंग कंट्रोलची सुविधा आहे. आयफोन 16 प्रो मॉडेलची बॅटरी 3577 mAh तर आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलची बॅटरी 4676 mAh एवढ्या क्षमतेची असेल. या दोन्ही मॉडेल्सला वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. आयफोन 16 प्रो आणि मॅक्स या दोन्ही मॉडेल्समधील दोन कॅमेरे हे 48 मेगा पिक्सेल तर एक कॅमेरा हा 12 मेगा पिक्सेलचा असेल. या दोन्ही फोनचा फ्रंट कॅमेरा हा 12 मेगा पिक्सेलचा असेल. या कॅमेऱ्यातून 4k व्हिडीओ शुटिंग करता येईल.
हेही वाचा :