AT Techology Disadvantages : AI अर्थात (AI Tool) आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल तुम्हा सर्वांना आतापर्यंत माहिती झाली असेलच. आपण अनेक प्रकारची AI tools देखील वापरली असतील. एकीकडे AI  आपल्यासाठी फायदेशीर आहे, तर त्याचे गंभीर तोटेदेखील आहेत. तोटे लक्षात घेता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कायदा करण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. चुकीच्या गोष्टींमध्ये AI चा वापर केला जात असून त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात फोटो आणि व्हिडिओमधून कपडे काढण्यासाठी AI चा वापर करणाऱ्या अॅप्स आणि वेबसाइट्सच्या संख्येत वाढ झाली आहे. 


ग्राफिका नावाच्या सोशल नेटवर्क अॅनालिसिस कंपनीने ही माहिती शेअर केली आहे की, एआयच्या मदतीने कपडे काढण्याची सेवा देणाऱ्या या वेबसाइटला सप्टेंबरमध्ये 24 मिलियन लोकांनी भेट दिली आहे. न्यूडिफाई नावाच्या या बहुतेक सर्विस मार्केटिंग करण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे.


सोशल मीडियावर लिंक्स व्हायरल


रिपोर्टनुसार, X आणि रेडिटवर अशा लिंक्सच्या संख्येत वाढ झाली आहे जी वापरकर्त्यांना फोटो आणि व्हिडिओमधून कपडे काढण्याची परवानगी देते. विशेषतः बहुतांश सर्विसेस केवळ महिलांच्या फोटोंवर काम करतात. सोशल मीडियावरून  महिलांचे फोटो काढले जातात आणि मग ते निर्वस्त्र करून शेअर केले जातात, अस या अहवालात म्हटले आहे. अशा लिंक्सची संख्या वाढली आहे.


शाळकरी मुलांना धोका...


अशा अॅप्स आणि वेबसाईटवरून कोणाचाही डीपफेक पोर्नोग्राफी व्हिडिओ बनवता येतो. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या सायबर सिक्युरिटी डायरेक्टर इवा गॅलपेरिन यांनी सांगितलंय की, शाळकरी मुलांपासून ते सर्वसामान्यापर्यंत दररोज अशा अॅप्स आणि वेबसाइट्सचा वापर केला जात आहे आणि ही चिंतेची बाब आहे. 


डीपफेकचाही धोका


डीपफेक टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करू शकते. 'Deep Learning' आणि 'Fake' अशा दोन शब्दांपासून DeepFake हा शब्द तयार झाला आहे. ही टेक्नॉलॉजी खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी Generative Adversarial Networks (GANs) याचा वापर करते. यामध्ये केवळ या व्यक्तीचा चेहराच नाही, तर त्याचा आवाज, हावभाव, डोळ्यांच्या पापण्या, बोलताना होणारी ओठांची हालचाल, डोळ्यांचे भाव आणि अशा कित्येक गोष्टी कॉपी करता येऊ शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीचा काहीही बोलतानाचा व्हिडिओ तयार करता येऊ शकतो.


इतर महत्वाची बातमी-


iphone 14 and iPhone 14 Plus best offers : काय सांगता? iphone 14 आणि iPhone 14 Plus वर 14 हजारांची सूट ; पाहा भन्नाट ऑफर्स..