India vs England : यंदा पार पडलेल्या आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामानंतर चांगल्या फॉर्ममध्ये आलेला भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra chahal) मर्यादीत षटकांच्या सामन्यात कमाल कामगिरी करताना दिसत आहे. सध्या तो अव्वल दर्जाचा फिरकीपटू असून परत आलेल्या फॉर्मबद्दल बोलताना चहलला बुद्धीबळ (Chess) खेळून आत्मविश्वास मिळतो असं त्याने स्वत: सांगितलं आहे. 


युजवेंद्र चहल हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फिरकीपटू असून त्याने चेस यूथ चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. ज्यानंतर आता एक अव्वल दर्जाचा क्रिकेटर असणारा चहल म्हणतो,''बुद्धीबळ माझ्या आतील आत्मविश्वास परत आणतो. अनेकदा तुम्ही चांगली गोलंदाजी करुनही तुम्हाला विकेट मिळत नाही. पण मी कायम फलंदाजावर लक्ष ठेवतो, तो कोणत्या बॉलवर कसा शॉट खेळेल याचा विचार करुन मी बोलिंग करतो.'' दरम्यान सध्या कमाल फॉर्मात असलेला चहल आगामी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघात असण्याची दाट शक्यता आहे. पण त्याला त्याचा फॉर्म कायम ठेवणं गरजेचं आहे.


युजवेंद्र चहलने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 62 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 19 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्याने 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही सिलेक्ट होऊ शकतो.


हे देखील वाचा-