EPFO latest News :  भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणुकीवर अधिक व्याज दर मिळण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. EPFO ने वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षासाठी  ईपीएफ व्याज दर 8.5 टक्क्यांनी घटवून 8.1 टक्के इतका केला होता. त्यावेळी मोठी टीका झाली होती. आता पीएफ गुंतवणूकदारांना अधिक व्याज देण्यासाठी EPFO शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या EPFO कडून शेअर बाजारात 15 टक्के गुंतवणूक केली जाते. आता ही मर्यादा 20 टक्क्यांवर नेण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून EPFO खातेधारकांना अधिक व्याज देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. 


शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याच्या निर्णयाला वित्तीय लेखा आणि गुंतवणूक समितीने (FAIC) मंजुरी दिली आहे,.  रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लागू केले असून खातेदारांना 15 हजार रुपये काढता येणार आहे. FAIC ने केलेल्या शिफारसीवर विचार करण्यासाठी आणि अंतिम निर्णय CBT घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय श्रम मंत्री यांच्या अध्यक्षेखाली असणाऱ्या CBT इक्विटी आणि इक्विटीबाबतच्या संबंधित योजनेत पाच ते 15 टक्क्यापर्यंतची गुंतवणूक मर्यादा 20 टक्के करण्यास मंजुरी देऊ शकते.  


EPFO ने ऑगस्ट 2015 मध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी  गुंतवणूक असलेल्या रक्कमेच्या पाच टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्यात आली. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 15 टक्क्यांवर करण्यात आले. 


श्रम आणि रोजगार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याची शिफारस FIAC ने केली असल्याचे सांगितले होते. EPFO च्या इक्विटी संबंधित गुंतवणुकीवर  वर्ष 2021 मध्ये 16.27 टक्के परतावा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.  वर्ष 2020-21 मध्ये 14.67 टक्के परतावा मिळाला होता.