VIDEO: बोबड्या बोलीत धोनीच्या लेकीचं मस्त गाणं
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2017 03:47 PM (IST)
झिवाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवाचा नवा गोड व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत झिवा मल्याळम गाणं गात असल्याचं पाहायला मिळतं. झिवाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन वर्षाच्या झिवाचं इन्स्टाग्रामवरील हे स्वत:चं अकाऊंट आहे. अर्थात हे अकाऊंट धोनी किंवा त्याची बायको साक्षी हाताळत असावेत. झिवा आपल्या बोबड्या बोलीत छानसा सूर लावून मस्त गाणं गाताना आपल्याला पाहायला मिळते. झिवा जे गाणं गात आहे ते मल्याळममधील श्रीकृष्णाचं भक्तीगीत आहे. यापूर्वीही झिवाचे अनेक व्हिडीओ धोनी आणि साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळाले होते. नुकतंच धोनीने साक्षीसोबत बेसन लाडून खाताना व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी धोनीने ‘अटॅक ऑन बेसन का लड्डू’ असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता.