मुंबई : आत्मचरित्राच्या निमित्ताने जुनं रिलेशनशीप उघड केल्यामुळे अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीवर त्याची एक्स गर्लफ्रेण्ड निहारिका सिंग रागवली आहे. केवळ पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी महिलांचा अनादर करण्यातही नवाझ मागेपुढे पाहत नसल्याचा आरोप तिने केला.
निहारिका सिंग ही 2005 साली 'फेमिना मिस इंडिया अर्थ' किताबाची मानकरी ठरली होती. 'मिस लव्हली' चित्रपटातून तिने नवाझसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आपलं नातं जगजाहीर करण्यापूर्वी संमती न घेतल्यामुळे निहारिका नाराज झाली आहे. ज्याप्रकारे नवाझने माझी प्रतिमा रंगवली आहे, ते पाहता स्वतःच्या पुस्तकाचा खप व्हावा, म्हणून नवाझ महिलांचा अनादर करताना मागेपुढे पाहत नसल्याचं दिसत आहे, असं निहारिका म्हणाली.
'2009 मध्ये मिस लव्हली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. आमचं नातं जेमतेम काही महिने टिकलं. माझ्या बेडरुममध्ये कँडल्स लावून मी त्याला बोलावलं, उतावळेपणे त्याला फोन केले, त्याच्या वतीने दुसऱ्या महिलांना ईमेल केले, हे ऐकून तर मला हसूच फुटलं' असं निहारिका म्हणते.
'अर्थातच त्याला त्याचं पुस्तक खपवायचं आहे. त्यासाठी तो महिलांचा अनादर करायलाही तयार असल्याचं दिसतंय' अशी खंत निहारिकाने व्यक्त केली.
'अॅन ऑर्डिनरी लाईफ' या आत्मचरित्रातून नवाझुद्दीन खाजगी आयुष्य आणि रिलेशनशीप्सबद्दल बरंच काही बोलल्याची चर्चा आहे.
नवाझुद्दीनने काय लिहिलंय?
मी पहिल्यांदाच निहारिकाच्या घरी गेलो. तिने दार उघडताच घराचा एक नजारा दिसला आणि मी भारावून गेलो. शंभर-एक मेणबत्त्या उजळल्या होत्या. तिने अंगावर फर घेतलं होतं. ती फारच गोड दिसत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं.
मी धट्टाकट्टा असल्यामुळे तिला कवेत उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन गेलो. आम्ही अत्यंत आवेगाने प्रेमात बुडालो. अशाप्रकारे अनपेक्षितरित्या आम्ही रिलेशनशीपमध्ये अडकलो. आमचं रिलेशनशीप दीड वर्ष चाललं, असं नवाझ पुस्तकात म्हणतो.
जुनं रिलेशनशीप उघड, निहारिका नवाझवर नाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Oct 2017 12:58 PM (IST)
निहारिका सिंग ही 2005 साली 'फेमिना मिस इंडिया अर्थ' किताबाची मानकरी ठरली होती. 'मिस लव्हली' चित्रपटातून तिने नवाझसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -