भुवनेश्वर: टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराजने जोरदार कमबॅक केलं आहे. युवराजने इंग्लंडविरुद्धच्या कटक वन डेत खणखणीत शतक झळकावलं. युवराजने 98 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. युवराजचं हे कारकिर्दीतील 14 वं शतक आहे.
युवराजने यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता सहा वर्षांनी युवराजला शतक करता आलं.
युवराजचं हे भारतातील सातवं तर इंग्लंडविरुद्धचं चौथं शतक आहे.
युवराजने शेवटचं वन डे शतक 2011 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलं होतं. त्यावेळी चेन्नईत त्याने 113 धावा ठोकल्या होत्या.