शिवसेना-भाजप 'पापी', मुंबईच्या समस्यांवर काँग्रेसचं पोस्टरमधून बोट
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 01:33 PM (IST)
मुंबई : शिवसेनेच्या 'डीड यू नो' ला राष्ट्रवादीने 'यू शुड नो'ने उत्तर दिलं असतानाच आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. 'पाप' या मथळ्याखाली मुंबईच्या समस्यांवर बोट ठेवत काँग्रेसने सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या निमित्ताने सुरु केलेली बॅनरबाजी मुंबईत ठिकठिकाणी दिसत आहे. डम्पिंग ग्राऊंड, रस्त्यावरील खड्डे, पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यात पाणी तुंबणं, वाहतुकीची कोंडी, शाळा यासारख्या मुद्द्यांवर काँग्रेसनं मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे.