युवराज सिंगने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. 'या दिवाळीत कृपया फटाके फोडू नका, अशी मी कळकळीची विनंती करतो. गेल्या वर्षी आपल्या देशाची काय अवस्था झाली, हे तुम्ही पाहिलंत. इतकं वायू प्रदुषण होतं, की मी घराबाहेरही पडू शकत नव्हतो. लहान मुलं, वृद्ध या सर्वांच्या आरोग्यासाठी फटाके फोडू नका.' असं युवराजने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/917045683126902784
हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करताच ट्विटराईट्सनी मात्र त्याची खिल्ली उडवली आहे. युवराजच्या लग्नातील फटाक्यांचा फोटो शेअर करत अनेकांनी 'हाच का तुझा दुटप्पीपणा?' असा प्रश्न विचारला आहे.
https://twitter.com/camishravikas/status/917402378491486208
दिल्लीतील फटाके विक्रीवरील बंद कायम!
12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार होता. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र 12 ऑक्टोबर रोजी काढलेल्या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.