सनी लियोनीचं लाडक्या लेकीला खास सरप्राईज!
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2017 09:13 AM (IST)
डॅनियलने ट्विटरवर शनिवारी वाढदिवसाच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने दत्तक घेतलेली मुलगी निशा कौर वेबरचा दुसरा वाढदिवस धडाक्यात साजरा केला. सनीच्या घरात निशाचा हा पहिला वाढदिवस होता. सनी लियोनी आणि तिचा नवरा डॅनियन वेबरने यंदाच निशाला लातूरमधील आश्रमातून दत्तक घेतलं होतं. डॅनियलने ट्विटरवर शनिवारी वाढदिवसाच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. "आमच्या मुलीला दुसऱ्या तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देत आहोत. हे अनमोल आहे, लव्ह यू निशा कौर वेबर!," असं डॅनियलने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं. https://twitter.com/DanielWeber99/status/919294190709719040 यानंतर सनीने डॅनियलचं ट्वीट करुन लिहिलं की, "आज मित्र आणि कुटुंबीयांना भेटून दिवस आनंदात गेला. आमची मुलगी आज दोन वर्षांची झाली होती. तुझ्यामुळे आमचं आयुष्य उजळलं. हॅप्पी बर्थडे निशा कौर वेबर." सनी आणि डॅनियलने अमेरिकेत लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा केला. निशाच्या वाढदिवसासाठी डिस्ने लॅण्डमध्ये असल्याचं सनीने ट्वीटद्वारे सांगितलं. https://twitter.com/SunnyLeone/status/918701532199006208