टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने या सामन्यातील युवराजच्या खेळीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. युवराजने कॅन्सरला हरवलं होतं, आज तर फक्त इग्लंडला हरवलंय. त्याच्याकडून सर्वांनी काही तरी शिकायला पाहिजे, युवी तुझा अभिमान वाटतो, असं वीरुने म्हटलं आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/822117061182758912
टीम इंडियाची या सामन्यात 27/3 अशी डळमळीत अवस्था झाली होती. त्यानंतर आलेल्या युवीने इनिंग सावरत मोठी खेळी केली. त्याने 127 चेंडूंमध्ये तब्बल 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा ठोकल्या.
युवीची सर्वोच्च धावसंख्या
शतकानंतर सुसाट सुटलेल्या युवीने स्वत:च्या सर्वोच्च 139 धावांचा विक्रमही मोडला. युवीने 126 चेंडूत 150 धावा केल्या. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात वोक्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
संबंधित बातम्या :