मुंबई: एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरु असली तरी पुन्हा एकदा सेना-भाजपमधील तणाव वाढला आहे. कारण भाजपमधील बोलबच्चनगिरी करणाऱ्या आवरा नाहीत युतीमध्ये व्यत्यय येईल असा इशारा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भाजपला दिला आहे.

'युतीबाबतच्या बैठकीतून फार काही निष्पन्न नाही'

'युती जर करायची तर संपूर्ण महाराष्ट्रात करायची. जिल्हा परिषदा, पंचायत समिता आणि 10 महापालिकेत युती व्हावी असा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. आतापर्यंत युतीच्या बैठकीचे दोन राऊंड झाले. मात्र, त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही.' अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

 'बोलबच्चन नेत्यांना आवरावं...'

'युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षातून प्रतिनिधी नेमलेले असताना काही  वातावरण कलुषित करणारी वक्तव्य केली जात आहे. त्यामुळे अशा लोकांना आवर घालणं हे त्या-त्या पक्षाचं काम आहे. नाहीतर युतीच्या चर्चेत व्यत्यय येईल. तसं झालं तर, पुढे काय होईल हे सर्वांना ज्ञात आहे.' असं म्हणत अनिल देसाई यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे.

'राजकीय कुरघोड्यांना लोकं थारा देणार नाहीत'

'आज मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून दोन महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र टॅक्स टेररिजमसारखे विषय काढून  आपण काही तरी करत असल्याचा कृत्रिम प्रयत्न आहे. त्यामुळे  लोकांना सारं काही कळतं आहे. अशा प्रकारच्या कुरघोड्यांना लोकं थारा देणार नाहीत.' असंही देसाईंनी भाजपला सुनावलं.

'प्रत्येक गोष्टीला तारतम्य असावं'

'मुंबईत कुठले रस्ते कुठे जातात, किती लांबीचे आणि रुंदीचे याचा अभ्यास तरी आहे का? राजकीय कुरघोडी करणं चुकीचं. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे कोणती गोष्ट कुठपर्यंत करावी याचं तारतम्य असावं.' असंही देसाई म्हणाले.

VIDEO: