योगेश्वर दत्तने मागितली देशवासियांची माफी
अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकचा गुडविल अँबेसीडर बनवण्यात आलं होतं. त्याला योगेश्वर दत्तने विरोध केला होता.
मी हरल्यानंतर मला सुपरस्टारच्या फॅनने शिव्या दिल्या होत्या. पण आपल्या देशात कुत्र्यांना भूंकण्याचा अधिकार आहे आणि ते भूंकतच राहतील. असंही त्याने सांगितलं आहे.
योगेश्वर दत्त ऑलिम्पिकमध्ये हरल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कुस्तीचा सामना होता. मी हरल्यानंतर चाहत्यांचे संदेश आले ज्यात ते निराश झाल्याचं म्हटलं होतं. पण मी सर्वांना विनंती करतो की, त्यांनी निराश होऊ नये. मी पुन्हा सर्वांची माफी मागतो. अशा शब्दात योगेश्वरने सर्वांची माफी मागितली.
फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह येऊन त्याने सर्वांची माफी मागितली.
भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये पदक न मिळवल्याबद्दल देशातील जनतेची माफी मागितली आहे.