Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चे (Visapur Kesari) मैदान मारलं आहे. सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा (Punjab) पैलवान नवजीत सिंगला (Navjeet Singh) लोळवले. अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं कुस्तीप्रेमी होते.


भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थिती


महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेला पैलवान सिकंदर शेखची पाच लाखांची ही कुस्ती होती. या कुस्तीत सिंकदेरने पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला पाडले. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येनं कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती. विसापूर येथे यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या मैदानावर लहान मोठ्या अशा 150 ते 200 रंगतादर कुस्त्या झाल्या. 


Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिंकदर शेखची जोरदार चर्चा


शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) हा महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला. पण सर्वत्र पैलवान सिकंदर शेखची याचीच जोरदार चर्चा रंगली होती. सेमीफायनलमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्याचे सांगत चाहुबाजूने त्याच्या पाठीशी चाहते उभे ठाकले होते. यावर स्वतः सिकंदरने भाष्य केलं आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून सिकंदर शेखकडे अनेकांच्या नजरा होत्या. मात्र, सेमीफायनलमध्ये त्याच्यावर पंचांनी अन्याय केला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. उपकेसरी महेंद्र गायकवाडकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं होते. अन्याय झाल्याचंही त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितलं होतं. मात्र, कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. 


Sikandar Shaikh : सिकंदरने अनेक अनुभवी मल्लांना चितपट केलं आहे


सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा आहे. सिकंदरच्या घरात आजोबापासूंनच कुस्तीचा वारसा आहे. वडील रशिद शेख हे देखील पैलवानकी करत होते. सिंकदर वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवत आहे. सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना त्याने चितपट केलं आहे. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. तो सैन्यदलाकडून खेळतो.  


महत्त्वाच्या बातम्या:


महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...