Sushil Kumar : प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) ज्याने एकदा नाही तर दोन वेळेस ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं. तो सध्या कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. दरम्यान आता जेलमध्ये राहून तो जेलमधील इतर आरोपींना कुस्तीचे आणि व्यायामाचे धडे देणार आहे.


तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली असून जेलमध्ये कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे आता हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. याआधीच हा उपक्रम सुरु कऱण्यात येणार होता. पण दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे हा उपक्रम रद्द करण्यात आला होता. तिहार जेलचे महासंचालक संदीप गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत ते म्हणाले,''आम्ही आधीच हा उपक्रम सुरु करणार होतो. पण तेव्हाच कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे आम्ही असं करु शकलो नाही. पण आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरु करत आहोत. ज्यानुसार आता सुशील कुमार इच्छुक कैद्यांना व्यायाम आणि कुस्तीचे धडे देणार आहे.'' जेल अधिकाऱ्यांच्या मते सुशील हा एक प्रशिक्षित कुस्तीपटू असल्याने त्याच्या कोचिंगमुळे इतर आरोपींना फिट राहण्यात मदत होईल. तिहार जेलमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर परियोजनेच्या अन्वये  खो-खो, वॉलीबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुध्दीबळ आणि कॅरम अशा विविध खेळाचं प्रशिक्षण दिलं जात आहे.


सुशील कुमार जेलमध्ये


सुशील कुमार याला छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. मागी वर्षी 23 मार्च रोजी सहआरोपी अजय कुमारसोबत सुशीलला ताब्यात घेतलं असून सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये सुशीलने त्याच्या साथीरासह कुस्तीपटू सागर धनकर याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान सागर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha