Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) विराट कोहली सर्वात प्रभावी दिसत आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाजाच्या यादीत टॉपवर आहे. त्यानं अवघ्या पाच सामन्यात सामन्यात तीन अर्धशतकांसह 138.98 च्या सरासरीनं 246 धावा केल्या आहेत. विराट कोहली जवळपास तीन वर्ष खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यानं नोव्हेंबर 2019 महिन्यात त्याच्या कारकिर्दीतील 70वं शतकं ठोकलं होतं. त्यानंतर 71 वं शतक झळकावण्यासाठी त्याला जवळपास तीन वर्ष प्रतिक्षा करावी लागली. सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत विराटनं शतकांचा दुष्काळ संपवला. महत्त्वाचे म्हणजे, आशिया चषकापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) विराट कोहलीला एक मॅसेज आला होता. तो मॅसेज काय होता? याबाबत स्वत: विराट कोहलीनं एका कार्यक्रमात सांगितलंय.
आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, " मी खराब फॉर्ममध्ये झुंजत असताना महेंद्रसिंह धोनी एकमेव व्यक्ती होता, ज्यानं माझ्याशी संपर्क साधला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे की, माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तीशी माझं इतकं मजबूत नातं असू शकतं. हे परस्पर आदरावर आधारित मैत्रीसारखे आहे आणि हे त्या गोष्टींपैकी एक आहे, जे त्यांनी मला पाठवलेल्या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. 'जेव्हा तुझ्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जाते, तेव्हा लोक हे विचारायला विसरतात की, तू कसा आहेस'असा मॅसेज धोनीनं मला केला."
व्हिडिओ-
धोनीच्या या मॅसेजनं माझ्यासाठी एक लक्ष्य ठेवलं. मला नेहमीच अशा व्यक्तीच्या रुपात पाहिलं गेलं की, जो खूप आत्मविश्वासू आहे. मानसिकदृष्ट्या खूप मजबूज आहे, जो कोणत्याही स्थिती आणि परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. कशातूनही वाट काढू शकतो तसेच वाट दाखवू शकतो. काहीवेळा, तुम्हाला असं वाटते की एखाद्या वेळी, तुम्हाला खरोखर काही पावलं मागं घेण्याची आणि तुम्ही काय करत आहात आणि कसे करत आहात हे समजून घेणे आवश्यक आहे."
हे देखील वाचा-