T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND VS ENG) पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात प्रथम फंलदाजी करत भारतीय संघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि सलामीवीर अॅलेक्स हेल्सच्या (Alex Hales) वादळी अर्धशतकाच्या जोरावर इंग्लडनं हा सामना 16व्या षटकातच जिंकला. या पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.त्यानं सोशल मीडियावर विश्वचषकाच्या प्रवासाबाबत एक भावनिक पोस्ट केलीय. 


विराट कोहलीचं भावनिक ट्वीट-






 


विराट कोहली काय म्हणाला? 
भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक इमोशनल ट्वीट केलं. ज्यात त्यानं असं म्हटलंय की,  "आपलं स्वप्न पूर्ण न करताच आम्ही निराश मनानं ऑस्ट्रेलिया सोडत आहोत. पण एक गट म्हणून आम्ही आमच्यासोबतचे अनेक अविस्मरणीय क्षण सोबत घेऊन जातोय. आमच्या खेळात आणखी सुधारणा करण्याचं आमचं ध्येय आहे. स्टेडियममध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं आलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. ही जर्सी घालून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो."


भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी भारताचं फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला.इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मनं तुटली.भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डगआऊटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत हात मिळवून डगआऊटमध्ये पोहोचले, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसला. दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. त्यानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाली. त्यावेळ राहुल द्रविडनं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 


हे देखील वाचा-