T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला (IND vs ENG) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 10 विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी भारताच्या वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीपासून तर भारतीयांचं विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याबाबत राहुल द्रविडनं भाष्य केलं.


ट्वीट-






 


राहुल द्रविडच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-


भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळणं उपयुक्त ठरू शकतं
परदेशी लीग खेळण्याबद्दल बोलताना द्रविड म्हणाला की, भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळणं उपयुक्त ठरू शकतं. परंतु खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकतात की नाही? हे बीसीसीआय ठरवेल.


वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीबाबत राहुल द्रविड काय म्हणाले?
इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर कोणत्या खेळाडूच्या निवृत्तीबाबत बोलणं घाईचं आहे. यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. आम्ही पुढील विश्वचषकासाठी संघ तयार करण्याचा प्रयत्न करू.


अॅडिलेडच्या खेळपट्टीवर 180 धावांची गरज
अॅडिलेडमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय सघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं चार षटक आणि 10 विकेट्स राखून हे लक्ष्य गाठलं. यावर राहुल द्रविड म्हणाला की, या खेळपट्टीवर धावा कमी पडल्या. आम्ही किमान 180-185 धावा करायला हव्या होत्या, असं त्यांनी म्हटलंय. 


जोस बटलर- अॅलेक्स हेल्सचं तोंडभरून कौतूक
इंग्लंडविरुद्धच्या 10 विकेट्सच्या पराभवानंतर द्रविड म्हणाला की, या विश्वचषकात आमच्याकडे अनेक क्षण होते, पण आज आमच्या पदरात निराशा पडली. जोडी जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स त्यांचे प्रमुख खेळाडू आहेत, त्यांनी आमच्यावर दबाव आणला. आम्ही खेळावर नियंत्रण ठेवू असं आम्हाला वाटलं होतं.इंग्लंडचा संघ चांगला खेळला आणि हेच वास्तव आहे.


हे देखील वाचा-


IND vs ENG: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला