T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धा रंगणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी युएई क्रिकेट बोर्डाने नुकत्याच आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी सीपी रिजवान याच्याकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.  


जाहीर केलेल्या संघात 33 वर्षीय अनुभवी खेळाडू रोहन मुस्तफाचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. रोहन मुस्तफा याने युएईकडून सर्वाधिक एकदिवसीय आणि T20 सामने खेळले आहेत. रोहन मुस्तफा आशिया चषकाच्या पात्रता सामन्यांतही खेळला होता. पण तरीही त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. याशिवाय 16 वर्षीय अनकॅप्ड अष्टपैलू अयान खानला संघात स्थान मिळालेलं नाही. अंडर-19 विश्वचषकात अयान खानने दमदार कामगिरी केली. तरीही त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. दरम्यान चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, जवार फरीद, काशिफ दाऊद आणि कार्तिक मयप्पन या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर अहमद रझा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबीर अली, अलिशान शराफू आणि अयान खान यांनाही 15 सदस्यीय संघात स्थान मिळालं आहे.






  


न्यूझीलंड लवकरच जाहीर करणार संघ


दरम्यान या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी बऱ्याच देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनी मागील आठवड्यात संघ जाहीर केल्यावर श्रीलंकेने देखील T20 विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ जाहीर केला. T20 विश्वचषक 2022 मध्ये 16 संघ सहभागी होत आहेत, आतापर्यंत 13 देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत, तर 3 देशांनी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. न्यूझीलंड 20 सप्टेंबरला संघाची घोषणा करेल, अशी माहिती समोर येत आहे.


टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ आमने-सामने


टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे. 


टी-20 विश्वचषकासाठी युएईचा संघ


सीपी रिजवान (कर्णधार), वृत्या अरविंद (उपकर्णधार), चिराग सूरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लकड़ा, जवार फरीद, काशिफ दाउद, कार्तिक मयप्पन, अहमद रजा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबिर अली, अलीशान शराफू आणि अयान खान.


कुठे रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा?


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-