Vijay Hazare Trophy 2022 record : तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड तामिळनाडूच्याा फलंदाजांनी केले आहेत. सलामीवी नारायण जगदीशन आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. दोघांनी मिळून तब्बल 416 धावांची विक्रमी भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वात मोठी भागिदारी असून या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या कॅमेरून डेलपोर्ट आणि व्हॅन विक यांचा रेकॉर्ड मोडला आहे. तामिळनाडूच्या दोन्ही सलामीवीरांनी सुरुवातीपासून फटकेबाजी करत धडाकेबाज शतकं झळकावली. जगदीशन त्रिशतक झळकावण्यापासून हुकला तो 277 धावा करून बाद झाला, तर सुदर्शनने 154 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर तामिळनाडू संघाने आपल्या डावात 2 गडी गमावून 506 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.
बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या नारायण जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी समोरच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करताना शतकं झळकावली. यादरम्यान सलामीच्या जोडीने 416 धावांची विक्रमी भागीदारी केली. याआधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये 367 धावांची सर्वात मोठी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज व्हॅन विक आणि कॅमेरून डेलपोर्ट यांच्या नावावर होता. या दोन्ही फलंदाजांनी 2014 साली मोमेंटम एकदिवसीय कपमध्ये डॉल्फिनकडून खेळताना नाइट्सविरुद्ध हा विक्रम केला होता. याशिवाय, भारतीय जोडी ही जगातील पहिली जोडी आहे ज्याने सर्व लिस्ट ए क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्यातील 372 धावांच्या भागीदारीचा विक्रमही यावेळी मोडला गेला आहे. गेल आणि सॅम्युअल्सने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम केला होता.
जगदीशननं नावे केले अनेक रेकॉर्ड
तब्बल 277 धावा झळकावलेल्या एन जगदीशन याने बरेच रेकॉर्ड नावावर केले आहेत. प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सलग पाच शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कुमार संगक्कारा, देवदत्त पडिक्कल आणि अल्विरो पीटरसन यांच्या नावावर असलेला सलग चार शतकांचा विक्रम जगदीशनने मोडला. त्याने 141 चेंडूत 277 धावा काढताना विजय हजारे चषकातला पृथ्वी शॉचा 227 या सर्वोच्च धावांचा विक्रमही मोडला. प्रथमश्रेणी सामन्यात जगातील सर्वोच्च धावसंख्येचा अली ब्राऊनचा विक्रमही त्याने मोडला. तसंच विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो सहावा फलंदाज ठरला.
हे देखील वाचा-
N Jagadeesan: एकापाठोपाठ पाच शतकं, एक द्विशतक; कोहली, रोहित, पृथ्वी शॉसोबतच मोडले अनेकांचे विक्रम