IND vs AUS, World Cup 2023 Final : विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया (Australia) भारताचा (India) पराभव करून विश्वविजेता ठरला. वनडे क्रिकेटच्या (ODI Cricket World Cup) इतिहासात ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या (Team India) विजयाची अपेक्षा करणाऱ्या करोडो भारतीयांची निराशा झाली. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर निराशेचं वातावरण पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. सामना जिंकल्यानंतर हेडने रोहित शर्माला कमनशीबी म्हणाला आहे. 


Travis Head on Rohit Sharma : 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली. या सामन्यात त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of The Match) पुरस्कार देण्यात आला. हा किताब मिळाल्यानंतर हेडने रोहित शर्माबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "तो जगातील सर्वाधिक कमनशीबी व्यक्ती" असल्याचं वक्तव्य हेडने केलं आहे.


एक अविस्मरणीय दिवस


''हा एक अविस्मरणीय दिवस होता. त्याचा एक भाग बनून खूप आनंद झाला. घरी बसून विश्वचषक पाहण्यापेक्षा मैदानावर खेळणे चांगले. मी थोडा घाबरलो होतो, पण मार्नसने खूप चांगला खेळ केला आणि सर्व दडपण घेतलं. मला वाटले की, मिचेल ज्याप्रकारे खेळला, त्यामुळे आमच्या विजयाचा टोन सेट झाला आणि हीच ऊर्जा आम्हाला हवी होती.''


''जगातील सर्वात दुर्दैवी माणूस''


''आज रोहित शर्मा जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे. तो झेल पकडणे खूप चांगले होते. कोणास ठाऊक तो (रोहित) आऊट झाला नसता तर, त्याने शतक केलं असतं! विश्वचषक फायनलमध्ये शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत सामील होणं खूप खास आहे. पुढील काही दिवस खूप चांगले जाणार आहेत.''






स्वप्नातही कल्पना केली नव्हती


''मी असा कधीच विचार केला नाही. असे काही घडेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. छान दिवस होता. या मैदानावर उपस्थित राहणे ही एक चांगली भावना आहे. मी पहिले 20 चेंडू ज्या प्रकारे खेळले, त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. मला त्याच लयीत खेळ चालू ठेवता आला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. या संघाचा एक भाग असणं खूप खास आहे आणि या विजयात भूमिका बजावणं आणखी खास आहे.''


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travis Head : फुटबॉल खेळता खेळता क्रिकेटपटू झाला, 20 व्या वर्षी जीवघेण्या अपघातातून बचावला, ट्रॅव्हिसहेडची थरारक कहाणी