Babar Azam Reaction on Australia Win World Cup 2023 Final: वर्ल्डकप 2023 च्या (ICC World Cup 2023) संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियानं (Team India) धडाकेबाज कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत आपली छाप सोडली. अशातच यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी खूपच खराब राहिली. पाकिस्तानचा (Pakistan) धडाकेबाज फलंदाज बाबर आझमही (Babar Azam) फारशी चांगली खेळी करु शकला नाही. अशातच स्पर्धेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर बाबर आझमनं आपलं कर्णधार पद सोडलं. अशातच वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर बाबर आझमनं टीम इंडियाच्या पराभवावर सोशल मीडियामार्फत प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करून आणि सहाव्यांदा ट्रॉफी जिंकल्यालेल्या ऑस्ट्रेलियाच्या नेत्रदीपक विजयाबद्दल बाबरनं त्यांचं अभिनंदन केलं आहे.


ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचं 241 धावांचं लक्ष्य 6 विकेट्स शिल्लक असताना सहज गाठलं. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, "ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. अंतिम फेरीत किती दमदार कामगिरी केली." दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला केवळ 240 धावांवर रोखलं. मिचेल स्टार्कनं तीन तर जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी दोन गडी बाद केले.



प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर सहज विजयाची नोंद केली. हेडनं 120 चेंडूत 137 धावा केल्या आणि मार्नस लॅबुशेनसोबत सामना जिंकणारी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावा जोडून ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेलं. लॅबुशेन 58 धावांवर नाबाद राहिला आणि ग्लेन मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियासाठी विजयी धावा केल्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. 


टीम इंडियाचं स्वप्न भंगलं, आयसीसी ट्रॉफीवर कांगारूंचं वर्चस्व 


भारतीय क्रिकेट संघाला गेल्या 10 वर्षांत एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाला कधी अंतिम फेरीत तर कधी उपांत्य फेरीत सतत पराभव पत्करावा लागला आहे. रोहितसेनेला घरच्या मैदानावर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी होती. एवढंच नाही तर टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली, पण अंतिम फेरीत यलो मॉन्स्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑसी संघानं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियानं फायनल मारली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Australia World Cup Final Analysis: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया, फायनलमध्ये मात्र सपशेल फ्लॉप, कशी? 'ही' 5 सर्वात मोठी कारणं!