T20 World Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात विराट बॅटमधून आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकली आहेत. या कामगिरीसह टी-20 विश्वषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट टॉपवर पोहचला आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील अखेर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. या सामन्यात विराट कोहलीकडं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सचिन तेंडुलकर  एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत अशा आयसीसीच्या तिन्ही टूर्नामेन्ट्समध्ये त्यानं एकूण 2 हजार 719 धावा केल्या आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्यापासून विराट अवघ्या 95 धावा दूर आहे. 


विराट कोहलीनं आयसीसीच्या तिन्ही इव्हेंट्समध्ये एकूण 2 हजार 624 धावा केल्या आहेत. भारताकडून या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सचिन तेंडुलकर टॉपमध्ये आहे. सचिन तेंडुलकरनं एकही टी-20 विश्वचषक खेळला नसला तरी एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आशा आयसीसीच्या तिन्ही टूर्नामेन्ट्समध्ये त्यानं एकूण 2 हजार 719 धावा केल्या आहेत. 


ख्रिस गेल अव्वल स्थानी
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी सुपर 12 फेरीतील सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विराटच्या बॅटमधून 95 धावा निघाल्यास तो सचिनला मागं टाकेल. एकूणच बोलायचं झालं तर, या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 2 हजार 942 धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर, श्रीलंकेचा कुमार संगकारा 2 हजार 876 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा महेला जयवर्धने 2 हजार 858 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर आणि विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.


कधी, कुठं रंगणार भारत-झिम्बाब्वे यांच्यातील सामना
भारत- झिम्बाब्वे यांच्यातील सुपर-12 मधील पहिला सामना रविवारी 06 नोव्हेंबर रोजी  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत- झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


हे देखील वाचा-